प्रतिनिधी श्री सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी वरील उद्गाार काढले.
राष्ट्रीय सेवा योजना हा उच्च शिक्षणातील आणि महाविद्यालयातील अविभाज्य भाग असून त्यातून व्यक्तिमत्व विकास व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्य चालते. आणि याच उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. प्रभाकर देसाई तसेच हडपसर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन थोरात, पोलीस कर्मचारी दिनेश शिंदे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी, कार्यक्रम अधिकारी डॉ. किरण रणदिवे, प्रा- नितीन लगड, प्रा. शितल गायकवाड उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. सविता कुलकर्णी यांनी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच परिसराची गरज, विद्याथ्र्यांची आवड व क्षमता ओळखून जे उपक्रम हाती घेतले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी हडपसर परिसरातील अनेक प्रश्न विद्यार्थी यांच्या समोर मांडले आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सहकार्य केल्यास त्याचा मोठा उपयोग होईल असे मत त्यांनी मांडले. वाहतूक आणि त्यासंदर्भातील जाणीवजागृती यासाठी विद्याथ्र्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे यांनी विद्याथ्र्यांशी संवाद साधताना राष्ट्रीय सेवा योजना हा चांगला उपक्रम असून आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होतो अशी माहिती त्यांनी दिली.
सहाय्यक पोलीस अधिकारी सचिन थोरात यांनी विद्याथ्र्यांशी संवाद साधताना आपल्याला महाविद्यालयाचे आणि राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे दिवस आठवल्याचे त्यांनी सांगितले. काळ मोठया प्रमाणावर बदलत आहे आणि आपण आपली संगत, मित्र, परिस्थिती यांचा विचार करून भविष्याचा विचार करून वागावे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी विद्याथींना केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रभाकर देसाई यांनी आजुबाजुची परिस्थिती सांगितली- आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर मुळातच वाचन केले पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला- राष्ट्रीय सेवा योजना ही योजना महात्मा गांधीच्या विचारातून सुरू झाली- आणि अशा योजनांची गरज असल्याचे मत व्यक्त केले- राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी होताना स्वयंशिस्त असणे आवश्यक असून त्याचे ब्रीद विद्याथ्र्यांना सांगितले- विद्याथ्र्यांनी स्वतःचे घर, त्यानंतर परिसर समजावून घ्यावा, आजुबाजुची परिस्थिती पाहून संवेदना निर्माण होणे गरजेचे आणि राष्ट्रीय सेवा योजनेची त्यामध्ये मोठी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा- नितीन लगड यांनी तर सूत्रसंचालन डॉ. किरण रणदिवे यांनी केले- या कार्यक्रमाची संकल्पना प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांची असून त्याचे नियोजन डॉ. सविता कुलकर्णी, प्रा- नितीन लगड यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.


إرسال تعليق