प्रतिनिधी (श्री सुनिल थोरात)
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (पुरंदर) : सासवड सिताफळ बाजारात शेतकरी, व्यापारी, व व्यवस्थापन यांच्यात समन्वयासाठी ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या पुरंदर टिमने पुढाकार घेतला.
ग्राहक कल्याण फाउंडेशन पुरंदर तालुका कार्यकारिणीच्या वतीने सिताफळ बाजारातील व्यापाऱ्यांशी बैठक घेऊन खरेदी विक्री संदर्भात महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा केली. दिवाळीच्या मुहूर्तावर सासवडच्या सिताफळ बाजारातील व्यापाऱ्यांनी संघटनेच्या वतीने काही अटी व नियम जाहीर केले होते. शेतकऱ्यांसाठी हे सर्व त्रासदायक होते. या दरम्यान बाजारपेठेमध्ये सिताफळाची मंदी झाली होती. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून सासवडच्या सिताफळ बाजारात सर्व व्यापारी व शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांच्यात समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून शनिवार दि. (०५.११.२०२२) रोजी सकाळी दहा वाजता बैठकीचे आयोजन केले.
या बैठकीत शेतकरी, व्यापारी, व व्यवस्थापन यांना मान्य असलेला तोडगा निघाला. त्याप्रमाणे पुरंदर परिसरातील शेतकऱ्यांनी नेहमी प्रमाणे सिताफळे बाजारात आणावीत असे आवाहन ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या वतीने शेतकरी यांना करण्यात आले.
सासवडचा सिताफळ बाजार महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातील बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. शेतकर्यांना सिताफळ, पेरू, अंजीर या वाणाचे अधिकाधिक पैसे कसे मिळतील. याकडे व्यापाऱ्यांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. असे मत कार्यकारिणीने व्यक्त केले.
आणि पुर्वीप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या सोयीनुसार सिताफळे कॅरेटमध्ये भरून बाजारात आणावीत. या बैठकीसाठी ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे पदाधिकारी उत्तमराव झेंडे, संतोष बापू मगर, संतोषआबा काकडे, रामदास मेमाणे, बबनराव काळे, पंढरीनाथ कामथे, नाना फराटे, कैलास जाधव, प्रशांत वांढेकर, अनिल खेडेकर उपस्थित होते. त्याचबरोबर अनेक शेतकरी व व्यापारी काळुराम मगर, गिरीश काळे, अजित पोमण, बापू शेलार, सागर धुमाळ, गणेश काळे, काळ्हाने तसेच दिपक काळे व सर्वसामान्य शेतकरी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी सक्रिय आहेत. यांच्याशी संपर्क साधून ग्राहकांची लूट थांबवावी. असे आवाहन राज्याचे पदाधिकारी उत्तमराव झेंडे, संतोष बापू मगर, संतोष आबा काकडे यांनी केले.


إرسال تعليق