शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

आरक्षण हक्क कृती समिती जिल्हा सोलापूर संलग्नित. "असंघटीत कामगार संघटने"च्या वतीने विलास गायकवाड यांचा सत्कार.!!


 प्रतिनिधी सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


सोलापूर :- सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर येथील कार्यालयामध्ये नव्याने रुजु झालेले सरकारी कामगार अधिकारी विलास गायकवाड यांचा भव्य सत्कार " आरक्षण हक्क कृती समिती " सोलापूर जिल्ह्याच्या असंघटीत कामगार संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने आरक्षण हक्क कृती समितीचे जिल्हा समन्वयक तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सोलापूर जिल्हा सहसचिव राजाभाऊ सोनकांबळे यांच्या हस्ते सरकारी कामगार अधिकारी विलासराव गायकवाड यांचा पुष्पगुच्छ देत त्यांच्यासोबत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षक - श्रेणी -१ चे अधिकारी अय्युब पठाण यांच्यासमवेत कार्यालयामध्ये उचित भव्य सत्कार करण्यात आला.

         या वेळी सत्कार करताना पिंपरी चिंचवड , पुणे, येथील असंघटीत कामगार संघटनेचे नेते , बाबुराव गायकवाड, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते गौतम मसलखांब, असंघटीत कामगार संघटनेचे प्रमुख अविनाश वाघमारे, एमआयडीसी असंघटीत कामगार संघटनेचे प्रमुख शिवशंकर गायकवाड, अजय चवरे, आटो चालक व हॉटेल्स  कामगार असंघटीत कामगार संघटनेचे प्रमुख राहुल गायकवाड, कुमार वाघमारे, महालिंग गायकवाड, आदी असंघटीत कामगार प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم