शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सदनिका फोडून रोख रकमेसह १४ लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी केले लंपास; मांजरी ग्रीन येथील घटना...!


 प्रतिनिधी (श्री सुनिल थोरात) 

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे हवेली : मांजरी बुद्रुक मांजरी ग्रीन येथील घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. घरी कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दिवसा ढवळ्या मांजरी ग्रीन  येथील सदनिका फोडून रोकड व दागिन्यांसह जवळपास १४ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

          या घरफोडीने मांजरी परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहू. घरफोडी नंतर घरातील महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या मांजरी ग्रीन सोसायटीत राहायला आहेत. महिला आणि कुटुंबीय कामानिनित्त बाहेरगावी गेले होते गावावरून घरी आल्यानंतर फिर्यादी यांना घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. घराचा दरवाजा उघडून घराची पाहणी केली असता बेडरूम मधील कपाटामधील

व बेडमधील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. तसेच घरातील रोकड, सोन्याचे दागिने असा १३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज आढळून आला नाही.

       घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم