शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

महिनाभर चाललेल्या काकड आरतीचा सांगता सोहळा संपन्न...भवरापूर


 प्रतिनिधी श्री सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (हवेली) : मंगळवार दि. ०८/०११/२०२२ रोजी मु. पो. भवरापूर येथे गेले एक महिन्यापासून विविध कार्यक्रम होत होते. आज काकड आरती या कार्यक्रमाची सांगता भक्तीमय व आनंदाच्या वातावरणामध्ये समाप्त झाली. 

           या गावातील विकास भजनी मंडळ व वारकरी भाविक भक्त रोज पहाटे चार वाजता येऊन पांडुरंगाची नित्यनेमाची पूजा करून काकड आरती गात असतात. त्यामध्ये विशेष करून मृदुंग वादक हभप. सुदामराव साठे व हभप. बाळासाहेब कुंभार पेटीवादक, हभप अशोकराव साठे व हभप. शिवाजी साठे व नित्य नेमाने काकड आरतीला हजर असणारे भाविक भीमराव कोतवाल, वसंत साठे, पोपट साठे, लक्ष्मण साठे, उत्तम साठे, अर्जुन साठे, सदाशिव साठे, व विनकरी दिगंबर जगताप तसेच महिला मंडळ बायोडाताई साठे, वत्सला साठे व इतर गावातील बहुतेक महिला वर्ग मनोभावे पूजा करून काकड आरतीला येत असतात. अशा आनंदमय वातावरणामध्ये महिनाभर चाललेल्या काकड आरतीचे सांगता आज रोजी संपन्न झाली.

Post a Comment

أحدث أقدم