शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

लोणी परिसरात संशयित रित्या फिरत असणार्या इसमांना घेतले ताब्यात : निघाले अट्टल घरफोडी करणारे___


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. हवेली) : घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरांना लोणीकाळभोर पोलीसांनी ठोकल्या बेड्या लोणी काळभोर पोलीस स्टेशन गुर नं ५२५ / २०२२ भा.द.वि. कलम ४५७, ३८० मधील तक्रारदार राजदिप रामदास यादव वय ३६ वर्षे, यांच्या सोरतापवाडी, उपळवस्ती ता. हवेली जि. पुणे येथील राहत्या घरामधुन अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागीणे व रोख रक्कम घरफोडी करुन लंपास केले. 

         आरोपीतांचा शोध घेण्यासाठी वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी पो.उपनि गोरे व तपास पथकातील अंमलदारांना यांना आदेश केल्याने त्याच अनुशंगाने अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस हवालदार नितीन गायकवाड यांचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, 'पांढरस्थळ वस्ती या ठिकाणी तीन इसम तोंडाला रुमाल बांधुन संशयीतरीत्या फिरत आहेत. त्यांचे कडे केशरी काळे रंगाची मोटारसायकल असुन त्याचेवर कोठेही नंबर नाही. ही माहीती मिळाल्याने वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना पोलीस हवालदार नितीन गायकवाड यांनी माहिती कळविली. असता त्यांनी तपास पथक प्रभारी पोउपनि गोरे व स्टाफ यांना सापळा रचुन सदर संशयीत इसमांना ताब्यात घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

          पोउपनि गोरे व सोबत पोहवा नितीन गायकवाड, पोहवा आनंद पाटोळे, पोना सुनिल नागलोत, पोना श्रीनाथ जाधव, पोशि नितेश पुंडे, पोशि शैलेश कुदळे, पोशि दिपक सोनवणे, पोशि बाजीराव वीर, पोशि निखील पवार, मपोशि विश्रांती फणसे असे पांढरस्थळ येथे सापळा रचुन थांबले असता खबर्याने सांगीतल्या प्रमाणे तीन इसम बिना नंबरच्या के. टी एम मोटारसायकल वरुन पांढरस्थळ येथील कॅनोलचे दिशेने संशयीतरीत्या फिरत होते. तेंव्हा त्यांना मोटारसायकल उभा करण्याचा इशारा केला असता त्यांनी त्यांची मोटारसायकल उभा न करता तेथुन निसटण्याचा प्रयत्न केला त्यावेळी वरील स्टाफचे मदतीने त्यांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव (१) काकाभाऊ बेरा राठोड वय ५० वर्षे रा. कुशेगाव ता दौंड जि. पुणे (२) अरुण विकास नानावत वय ३१ वर्षे रा. तामखडा रोड, पाटस ता. दौंड जि पुणे (३) करण भगत शेखावत वय २१ वर्षे रा. तामखडा रोड पाटस, ता. दौंड जि पुणे असे सांगीतले.



        ताब्यात घेतलेल्या आरोपीतांचे रेकॉर्ड चेक केले असता ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे दिसुन आल्याने त्यांचे कडे कसून तपास केला असता त्यांनी ऑक्टोबर महीन्यामध्ये सोरतापवाडी परीसरामध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या कडुन सोन्या-चांदीचे दागीने जप्त करण्यात आली असुन लोणीकाळभोर पोलीस स्टेशन अभिलेखावरील खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत. 

            आरोपी हे सध्या पोलीस कस्टडीमध्ये असुन अधिक तपास सुरु आहे.

(१) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु र नं ५२५ / २०२२ भादवि कलम ४५७, ३८०

(२) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुर नं ५११ / २०२२ भादवि कलम ४५७,३८०

(३) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु र नं २०३ / २०२२ भादवि कलम ३९५,३९७


             ही उल्लेखनीय कामगीरी अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५, मा. बजरंग देसाई सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, मा. दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, मा. सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोउपनि गोरे व त्यांचे सोबत पोहवा नितीन गायकवाड, पोहचा आनंद पाटोळे, पोना सुनिल नागलोत, पोना श्रीनाथ जाधव, पोशि नितेश पुंडे, पोशि शैलेश कुदळे, पोशि दिपक सोनवणे, पोशि बाजीराव वीर, पोशि निखील पवार, मपोशि विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.

         या कारवाई ने लोणी परिसरात नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم