शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

ग्राहक कल्याण फाऊंडेशन विभागीय बैठक संपन्न__पुरंदर, भोर, वेल्हा तालुक्यातील नियुक्ती पत्र वाटप__


शुभांगी वाघमारे
महाराष्ट्र पोलीस न्यूज

पुणे (ता. भोर) : ग्राहक कल्याण फाउंडेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष नरहारी गांजवे. यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भोर फाटा येथील वैभव हाॅटेल येथे संपन्न झाली. 


                पुणे जिल्हा अध्यक्ष गांजवे यांनी जिल्हा अध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेताच जिल्हयात संघटन जोमाने सुरू होणार असे संकेत भोरच्या विभागीय बैठकीत दिसून आले. या विभागीय बैठकीत भोर. पुरंदर व वेल्हा या तीन तालुक्यातील अध्यक्ष यांची नेमणूका करून करण्यात आली. 
          या कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून करण्यात आली. या नंतर निवृत्त कृषी अधिकारी बाळासाहेब धूमाळ, शिवसेना भोर, वेल्हा विधानसभा संघटक शैलेश वालगुडे यांंचा सत्कार जिल्हा अध्यक्ष गांजवे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय वालगुडे यांंची सुभाष काळे यांनी प्रस्ताव मांडला त्याला सुळके यांनी अनुमोदन दिले. 
         जिल्हा अध्यक्ष यांनी ग्राहक कल्याण फाउंडेशन विषयी मार्गदर्शन करताना संघटन, ग्राहक संरक्षण कायदा, रचना, कार्यपद्धती व कार्याची महत्वपूर्ण माहिती देऊन भविष्यात स्वयंपूर्ण कार्यकर्ता घडवणार असल्याचे सांगितले.


           शैलेश वालगुडे यांनी भविष्यात भोर, वेल्हा, खडकवासला सह पुणे जिल्ह्यातील गाव तेथे ग्राहक कल्याण फाऊंडेशन करणार ग्राहक संघटन मजबूत करु ग्राहकांच्या न्याय व हक्कासाठी लढा देणार व तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद गटाच्या नियुक्त्या करून एक नवीन पर्व सुरू करणार असे म्हणाले. 
         यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष नरहारी गांजवे यांनी बाबासाहेब धूमाळ यांना कृषी प्रतिनिधी, वेल्हा पुर्व अध्यक्षपदी वैभव दसवडकर, वेल्हा पश्चिम अध्यक्षपदी बाळासाहेब पिलावरे व भोर अध्यक्ष पदी सागर खुटवड यांची नियुक्ती पत्र देण्यात सन्मानित करण्यात आले. 
         यावेळी जिल्हा अध्यक्ष नरहारी गांजवे, उपाध्यक्ष बापूसाहेब पठारे, कार्यवाहक सुभाष काळे, कोषाध्यक्ष पोपट साठे, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख सुनिल थोरात, सदस्य शिवाजी सुळके पुरंदर अध्यक्ष मेमाणे व पदाधिकारी व सदस्य हजर होते. 


Post a Comment

أحدث أقدم