सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (ता. हवेली) : पुणे शहराच्या पुर्वेकडील पुणे शहरात प्रवेश करण्यापूर्वी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत_याच ग्रामपंचायतीच्या निवडणूकी संदर्भात एक नजर__
पुणे जिल्हातील सर्वात आर्थिक दृष्ट्या सक्षम, व राजकीयदृष्ट्या संवेदनाशिल मानली गेलेल्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीसाठी रविवारी (ता. १८) दिवसभरात मतदारांनी जवळपास ६८ टक्के मतदान केले.
(सरपंचपदाचे उमेदवार या विषयावर)
सरपंचपद थेट जनतेतुन निवडला जाणार असल्याने, कदमवाकवस्तीच्या सरपंच पदी नवपरीवर्तन पॅनेल प्रमुख चित्तरंजन गायकवाड यांची वर्णी लागणार का जनसेवा पॅनेलच्या कल्पना काळभोर यांची वर्णी लागणार याचा कौल मतदारपेटीत रविवारी मतपेटीत बंदीस्त केला.
(एकूण मतदान झालेले मतदान)
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे एकूण मतदान १८९२८ असुन, त्यापैकी दिवसभरात सहा प्रभागासाठी मिळुन १२८४९ मतदान झाले. स्वारगेट येथील गणेश कलाक्रिडा भवनात मंगळवारी (ता. २०) मतमोजनी होणार आहे.
(नवपरीवर्तन पॅनेलची रचना, प्रचार व सत्ता)
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीवर मागील पाच वर्षापासुन चित्तरंजन गायकवाड यांच्या गटाची सत्ता होती. पाच वर्षापुर्वी चित्तरंजन गायकवाड यांच्या पत्नी, गौरी गायकवाड ह्या सरपंच म्हणुन थेट जनतेतुन निवडुन आल्या_ मागील निवडणुकी प्रमानेच ग्रामपंचायतीची सत्ता पुढील पाच वर्षासाठीही आपल्याच हाती रहावी यासाठी या निवडणुकीत चित्तरंजन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नवपरीवर्तन पॅनेलच्या माध्यमातुन स्वतः चित्तरंजन गायकवाड सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तर त्यांनी १७ जागा १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यासाठी चित्तरंजन गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील वर्षभरापासुन फिल्डींग लावली व परफेक्ट उमेदवार देण्याचे काम केले हे प्रचाराचा शुभारंभ व सांगता सभेच्या नंतर गर्दीतून दिसले. यादरम्यान सरपंचपदासह ग्रामपंचायतही आपल्याच ताब्यात रहावी यासाठी सर्वप्रकार नियोजन बद्ध प्रचार करुन आघाडी घेतली होती.
(जनसेवा पॅनेलची रचना, प्रचार व सत्ता)
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची सत्ता घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदु काळभोर, भारतीय जनता पक्षाचे वरीष्ठ नेते प्रविण काळभोर, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर व माजी सरपंच ऋषी काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन, जनसेवा पॅनेलच्या माध्यमातुन सरपंचपदासह सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. सरपंचपदासाठी विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर यांच्या पत्नी, कल्पना काळभोर यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवले होते. ग्रामपंचायतीच्या राजकारणात नवपरीवर्तन पॅनलला पराभूत करायचेच या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नंदु काळभोर, प्रविण काळभोर, बाबासाहेब काळभोर व ऋषी काळभोर यांनी मागील पंधरा दिवसाच्या काळात तोडीस तोडज्ञउमेदवार देऊन नवपरीवर्तन पॅनेलला आव्हान उभे केले होते.
(प्रचाराची बदललेले स्वरुप)
प्रत्यक्ष प्रचारा दरम्यान सरपंचपदासह निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांनी, पारंपारिक प्रचाराला सोशल मीडियावर भर देत, बॅनर बाजी, पदयात्रा, कोपरा सभा, प्रत्यक्ष भेटीगाठी घेत प्रचाराची रंगत चांगलीच वाढली होती. प्रचारा दरम्यान कार्यकर्ते यांना मिष्टान्नाचा लाभ घेण्याची योग सोय करण्यात आली होती. दोन्ही पॅनेल प्रमुख व उमेदवारांनी प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे मोठ्या प्रमाणांत मतदारांना खुश ठेवण्याचा प्रयत्न यावेळी केला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.
(प्रत्यक्ष मतदानाचा दिवस)
पाठीमागील पंधरा दिवसापासून मतदारांना आम्हालाच मतदान करा असा प्रचार करुन अखेर मतदानाचा दिवस म्हणजे__रविवारच्या दिवशी जास्तीत जास्त मताचे दान आपल्यालाच मिळावे यासाठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवार व कार्यकर्ते धावपळ करत होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा वापर करण्यात आला. त्यामुळे सहा ही मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. अपंग व वृद्ध मतदारांनाही आणण्यासाठी चढाओढ लागली होती. सायंकाळी साडे पाच नंतर ही मतदारांना आणण्याचा सरपंच पदाच्या उमेदवारा बरोबर उमेदवार ही बुथ वर ठाण मांडून होते.
(पोलीस बंदोबस्त)
लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदानाच्या वेळी ग्रामपंचायत हद्दीच चोख बंदोबस्त लावल्यामुळे, दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याच बरोबर अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
(मतदानानंतर विजयाचा प्राथमिक अंदाज)
(विजयी गुलाम कोणाच्या हाती)
चित्तरंजन गायकवाड व कल्पना काळभोर या दोन्ही सरपंचपदाच्या उमेदवारासह निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ३७ उमेदवारांनी रविवारी सायंकाळी मतदान संपताच आपणच कसे मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार असा दावा करीत होते. परंतु पाठीमागील काळातील सार्वजनिक कार्य करत असताना नागरिकांचे प्रश्न कसे सोडवले?, नागरिकांना मनस्ताप किती झाला?, मतदारांना किती गृहित धरले?, मतदारांना किती कसे अडचणीत आणले?, पाठीमागील कोणत्या पक्षात आता कोणत्या पक्षात, पक्षाला एक निष्ठ होता का? मग मतदारांना उमेदवार एकनिष्ठ राहणार का? अशा सर्व मतदारांच्या नजरेतून मतदान खेचून घेणारा उमेदवार गुलाल उधळणार यात शंका नाही__
(मतदान टक्का कमी झाला?)
मात्र मतदानाची टक्केवारी पहाता, मतासाठी मोठी माया देऊनही, बहुसंख्य मतदारांनी उमेदवारांना आपल्यापासुन थोडे फार दूरच ठेवल्याची चर्चा सुरु झाली आहे. दोन्ही पॅनेलच्या खर्चाचा विचार केल्यस, किमान दहा कोटीची च्या आसपास "माया" निवडणुकीत गेल्याची नागरिकां मध्ये चर्चा आहे. मतदारांना दिलेल्या मायेच्या जोरावर " मोठ्या मताधिक्क्याने आपणच विजयी होणार” असा जाहीररित्या दावा करणारे खाजगीत मात्र तोंड टाकुन काळजी करत असल्याचे दिसुन येत होते. सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चित्तरंजन गायकवाड व कल्पना काळभोर यांच्यासह त्यांच्या समवतचे उमेदवार “मोठ्या मताधिक्क्याने "आपण" च विजयी होणार" अशा कितीही 'भपका' मारत असले तरी, मंगळवारी म्हणजेच मतमोजनीच्या दिवसीच कोण निवडुन येणार व कोण पडणार हे कदमवाकवस्ती मधील मतदान करणार्या खुद्द मतदारांना ही समजणार नाही. उमेदवार म्हणत असेले की मी येणार तरीही भ्रम मनात असणार हे नक्की__
(प्रभागनिहाय झालेले मतदान)
(एकुण मतदान- प्रत्यक्ष झालेले मतदान)
प्रभाग १ - (३३८५ - २४०३),
प्रभाग २- ( १९०१ - १४१५),
प्रभाग ३- ( १८५५ - ११२२),
प्रभाग ४- (२६५८ - १८५२),
प्रभाग ५- (४११४ - २८४६),
प्रभाग ६ - (५१०५ - ३२११ )
एकूण मतदान १८९२८ - झालेले मतदान १२८४९, एकूण मतदान ६७.९१ टक्के

إرسال تعليق