गावा गावातील कार्यक्रमाचा शेवट झाला. आता गावचा विकास, विकास आराखडा आणि माणस जोडा हार जीत राजकीय जीवनात होत असते.
निवडणूका वर्षानुवर्षे येत राहतात व निकाल जय पराजय होत असतो. शिल्लक फक्त माणुसकीच राहिल..
ग्रामपंचायत म्हणजे ग्राम संसदच, सर्वात अवघड आणि बिकट निवडणूक, इथं प्रत्येक जण आपापल्या परीने गावा साठी काही तरी करता येईल का जनतेची सेवा करण्याचे मनामध्ये जिद्द ठेवावी. फक्त गावाचा विकासहेच उदिष्ट उमेदवारांना असते. निवडणुकीत जनतेची सेवा आखणी करून या संग्रामात उतरतो. जीवन ही जशी लढाई आहे. तशी परिस्थिती निर्माण झाली की तुमची इच्छा असो नसो तुम्हाला लोकशाही देशात या रणसंग्रामात उतरणे गरजेचे असते.
नागरिकांच्या किंवा कार्यकर्त्या मुळे प्रत्येक्ष अप्रत्यक्ष तुम्हाला यात यावच लागत. राजकीय गोष्टी पासून नाही म्हणलं तरी रोजच्या जीवनात याची कधी ना कधी गरज पडते. तेव्हा लोकशाही प्रधान देशातील ही प्रक्रिया सरकार म्हणा किंवा जनता यश अपयशाने पूर्णपणे साजरी करते. जर विरोधक नसेल तर सत्तेतील मंडळी यांच्या अनवधानाने लोकशाही धोक्यात येऊ शकते.
म्हणून येणाऱ्या काळात आपला अजेंडा, आपली जबाबदारी, आपण जनतेला दिलेला वचननामा, याची शंभर टक्के नाही पण निदान ७० टक्के तरी पूर्तता केली. तरी ग्राम समृद्धी मध्ये नक्कीच वाढ होईल. युवक, महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक यांना केंद्र सरकार, राज्य सरकारने केलेल्या योजना ग्राम स्तरावर राबवून यात पक्षपातीपणा न करता सर्वांना याचा लाभ होईल. अशी प्रत्येक गावात विकासाची पहाट उजाडली तर नक्कीच महाराष्ट्रात, जिल्ह्यातव तालुक्यात एक वेगळा संदेश जाईल.
८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण करत नवनिर्वाचित सरपंच, आणि सदस्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली तर याचा सर्व सामन्याना नक्कीच फायदा होईल. राजकारणात यश अपयश या दोनही बाजू असतात त्यात या स्पर्धेत उतरणे याला खरी मानसिकदृष्ट्या सर्वोतोपरी तयारी लागते. हे सगळ्याना शक्य होत नाही. लोकशाहीचा उत्सव छान पार पडला आता विकासकामांना वेग देऊन ग्राम विकास करणे. हे आव्हान लिलया पार पाडली जाईल अशी सर्वाना अपेक्षा आहे.
विजयाचा उन्माद जास्त काळ टिकत नसतो विजय पचवता आला तर मोठा विजयासाठी आपल्याला तयारी करता येते. आणि अपयशाचे शल्य आपल्याला आलेला अनुभव समजून अजून तयारी करून पुढे यशस्वी होण्यासाठी तयारी करावी लागते..गाव सर्वांचे आहे आणि आपण सर्वजण गावाचे आहोत. "विजयातून सेवा" आणि "पराजयातून" "माणसे जोडा" आणि माणूसकी ही__
सर्व नवनियुक्त सरपंच व सदस्यांचे अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा__
"उपसंपादकीय लेख"
उपसंपादक
श्री सुनिल थोरात

إرسال تعليق