शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कर्मचारी व ठेकेदार यांच्या संगनमतामुळे पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पुन्हा बेमुदत धरणे आंदोलन__


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (हडपसर) : हडपसर मधील मांजरी बुद्रुक मधील मांजराईनगर भागातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये पाणीपुरवठा कर्मचारी व ठेकेदार यांच्या संगणमता मुळे पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ पुन्हा बेमुदत धरणे आंदोलन.

            मांजरी बुद्रुक येथील मांजराईनगर भागातील ७२ घरकुल ११६ घरकुल सटवाई नगर, राजीव गांधी नगर, वेताळ वस्ती, कुंजीर वस्ती, माळवाडी इत्यादी झोपडपट्टी भागासह गावठाण मध्ये पिण्याचे पाणी तसेच वापरण्याचे पाण्याचे नागरिकांचे हाल होत आहेत. आज पर्यंत याच प्रश्नावर पुणे मनपा समोर चार ते पाच वेळा आंदोलने झाली. ८ टँकर मंजूर झाले, ५० टाक्याचे टेंडर निघाले, परंतु संबंधित पाणीपुरवठा अधिकारी व ठेकेदार यांचे संगनमता मुळे या ठिकाणी वरील गोष्टींची पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही. प्रशासनाने ५० पैकी फक्त २५ ते ३० टाक्या या परिसरात बसवलेल्या आहेत. उर्वरित टाक्या गायब? यामध्ये पाणीपुरवठा अधिकारी व ठेकेदार यांच्या संगणकाचा दोष आहे. ८ टँकर नियमितपणे परिसरात येत नाहीत. काही टँकर लोकांना पाणी न देताच विहिरीत टाकून पसार होतात.



           तर काही टँकर वरील भागाशिवाय इतर भागात पैसे देऊन पुरवले जातात. त्यामुळे या झोपडपट्टी मधील गरीब लोकांना नियमितपणे पिण्याचे पाणी मिळत नाही... आणि आता तर संबंधित टँकर चालकाने रस्त्यावर अपघात करून येथील तीन माणसांचा जीव घेतला आहे. त्यामुळे भीतीने टँकर चालक या झोपडपट्टी भागामध्ये येत नाही, यास सर्व संबंधित ठेकेदार जबाबदार आहे...

         संबंधित पाणीपुरवठा कर्मचारी मात्र वेळोवेळी तक्रारी करूनही जाणून बुजून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. ही खूप गंभीर गोष्ट आहे. 

           त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करावी. ही लोकांमधून मागणी होत आहे. या भागातील नागरिक खूपच त्रस्त झाले असून. या विरोधात दिनांक २२/१२/२०२२ रोजी दुपारी तीन वाजता पुणे मनपा समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. असे निवेदन देऊन आंदोलनास परवानगी असे आपचे राजेंद्र साळवे यांनी दिले.

Post a Comment

أحدث أقدم