शुभांगी वाघमारे
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (बालेवाडी) दिनांक ४-१२-२०२२ रविवारी बालेवाडी लोटस हाऊस येथे बैठक घेण्यात आली विषय ऐतिहासिक धम्मभूमी बुद्ध विहार देहूरोड पुणे येथे २५ डिसेंबर २०२२ रोजी धम्म भुमी देहूरोड वर्धापनदिन साजरा करणे. बाबत स्त्रीमुक्ती दिन साजरा करणे बाबत बैठकीत विचार विनमय झाला.
या दोन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले हे दोन्ही कार्यक्रम दोन सत्रात घेणार येणार आहेत.
सकाळी १० ते २ या पहिल्या सत्रात "स्री मुक्ती दिन" हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. प्रा. अंजली ताई आंबेडकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत दुसऱ्या सत्रात दर वर्षी प्रमाणे याही वर्षी २५ डिसेंबर २०२२ रोजी ऐतिहासिक धम्मभूमी बुद्ध विहार देहूरोड पुणे येथे वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला माननीय भिमराव साहेब आंबेडकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या मिटींग मध्ये अश्या दोन विषयावर चर्चा होऊन बैठक आनंदात पार पडली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्रकाश ओव्हाळ, कोषाध्यक्ष भिमराव ढोबळे, वंचित बहुजन महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्षा सीमा भालेसईन, पुणे जिल्हा उपाध्यक्षा पुनम मेश्राम, पुणे जिल्हा सचिव स्मिता बाबरे, पुणे जिल्हा सचिव जयश्री सदावर्ते, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष लोखंडे, खेड तालुका जेष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब मोरे, पुणे शहर अध्यक्षा अनिता चव्हाण, सामाजिक धडाडीच्या कार्यकर्त्या वैशाली गायकवाड, मावळ तालुका अध्यक्ष नितीन ओव्हाळ, मावळ तालुका महासचिव सचिन, मावळ तालुका अध्यक्ष सारिका सिंग, मावळ तालुका उपाध्यक्षा मनिषा ओव्हाळ, तळेगाव शहर अध्यक्षा अलका कांबळे, वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते जास्तीतजास्त संख्येने उपस्थित होते.


إرسال تعليق