शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना मातृशोक...! कांताबाई चव्हाण यांच्यावर मूळ गावी होणार अंत्यसंस्कार__


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. हवेली) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मातोश्री कांताबाई लक्ष्मण चव्हाण (वय- ८६) यांचे आज सोमवारी (ता.५) पाच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले आहे. 

          कांताबाई चव्हाण यांच्यावर मागील दोन दिवसांपासून नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होती. त्यांची आज उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. कांताबाई चव्हाण यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी (ता. ६) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मूळ गावी पिंपरी (मावडी ता. पुरंदर जिल्हा पुणे) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

أحدث أقدم