सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (ता.हवेली) : पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एच. पी गेट नंबर ३ च्या समोर टँकरने पाठीमागून ठोकरल्याने चारचाकी गाडी पुढे गेल्यावर आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली.
या तिहेरी वाहनांचा झालेला अपघातात एकाच कुटुंबातील पाचजण जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. २४) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
सारंग प्रशांत पाटील (वय २८), सुबोध प्रशांत पाटील (वय २७) अंकिता सारंग पाटील (वय- २४) श्वेता सुबोध पाटील (वय २४) व त्रिशिव सारंग पाटील (वय ८ महिने) रा. सर्वजन इस्ट, मुंबई, अशी अपघातात जखमी झालेल्या पाच जणांची नावे आहेत.
अपघाताची भिषणता एवढी मोठी होती की अक्षरशः चारचाकी गाडी हि दोन्ही बाजूनी चक्काचूर झाली होती. "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणी नुसार नशीब बलत्तर म्हणून वाचले पाचजण अशी चर्चा परिसरात सुरु होती.
पाटील कुटुंब हे पुण्यावरून कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका नर्सरीत झाडे पहायला व खरेदी करण्यासाठी निघाले होते. यावेळी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत सकाळी पाऊणे दहा वाजण्याच्या सुमारास आले असता, एच. पी गेट नंबर ३ च्या समोरील बाजूवरुन एक टँकरने पुण्याकडे बाजूला जाण्यासाठी रस्ता दुभाजकावरून जात होता. यावेळी पाटील हे त्यांच्या जवळ असलेली चारचाकी गाडी चालवीत असताना अचानक आयशर टेम्पोने ब्रेक दाबल्याने पाटील यांनी गाडी थांबवली. मात्र पाठीमागून येणाऱ्या इंधनवाहू टँकरने पाठीमागून पाटील चालवीत असलेल्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत चारचाकी गाडी हि समोर असलेल्या आयशर टेम्पोच्या खाली गेली. हा अपघात एवढा भिषण होता कि गाडीमध्ये असलेले पाटील कुटुंबातील चौघांचे पाय हे या अपघातात गुतून पडले होते. त्यामुळे त्यांना हालचाल हि करण्यात येत नव्हती.
घटनास्थळी घटना घडताच स्थानिक नागरिकांनी लोणी काळभोर पोलिसांची संपर्क साधला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस नाईक अजिंक्य जोजारे, तेज भोसले, ईश्वर भगत, घनश्याम आडके यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल होताच सतीश काळभोर, स्थानिक नागरीक व लोणी काळभोर पोलिसांनी तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर कटरच्या सहाय्याने पत्रा कट करून चारचाकी गाडीत अडकलेल्या पाचही जणांना सुखरूप बाहेर काढले.
अपघात हा टँकरचालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटून झाल्याने प्राथमिक दिसत असल्याने त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
तर या अपघातात जखमी झालेले सारंग पाटील व अंकिता पाटील यांच्या पायाला इजा झाली असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


إرسال تعليق