सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (ता. हवेली) : कदमवाकवस्ती येथील श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गोल्डन सियारा पब्लिक स्कूल मध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात सादर करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहीद जवान सौरभ नंदकुमार फराटे यांचे आई व वडील यांच्या हस्ते ध्वजारोहण पडले पडले. कदमवाकवस्ती सरपंच चित्तरंजन गायकवाड, सदस्य कोमल काळभोर, सदस्य सिमिंता लोंढे, सेवानिवृत्त डीवायएसपी पी एन कोळीसाहेब संस्थेचे चेअरमन शैलेश चंद, व्हा.चेअरमन रमेश चंद, खजिनदार अर्जुन चंद, सहखजिनदार प्राजक्ता चंद, संचालक दादा चंद, गणेश चंद, उद्धव जाधव, रुचिता चंद, रोहन चंद मुख्याध्यापिका प्रीती खणगे या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
स्कूलमध्ये प्रि- प्रायमरी विभागाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गाण्यावर नृत्य सादर केले. तसेच प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी पिरॅमिड सादर केले. शाळेच्या स्काऊट गाईड पथकाने केलेले संचलन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. मान्यवरांनी बोलताना विद्यार्थ्यांचे आणि शाळेने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप भिसे यांनी केले. आणि आभार रेश्मा मरकड. यांनी मानले. कार्यक्रमात सर्व शिक्षक, सेवक सेवकवृंद विद्यार्थी पालकांनी उत्साहात सहभाग नोंदवला.

إرسال تعليق