भाऊ वैजल
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पालघर (मोखाडा) : जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे ग्रुप ग्रामपंचायत कोचाळे कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सांस्कृतिक वाद्य साहित्याचे वाटप करण्यात आले. दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या क्रीडा साहित्य बरोबर वाद्य साहित्य अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपली कला प्रगत करत पुढे जावे या अनुषंगाने कारेगाव कोचाळे ग्रुप ग्रामपंचायत कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सांस्कृतिक वाद्य साहित्यांचे वाटप करण्यात आले.
शैक्षणिक अडचण असल्यास अवश्य संपर्क करा योग्य ती मदत ग्रामपंचायत कडून करण्याचा प्रयत्न करू असे सरपंच यांनी सांगितले.
कारेगाव कोचाळे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच देवराम कडू व यांचे जिल्हा परिषद शाळा कोचाळे चे मुख्याध्यापक फसाळे सर यांनी आभार मानले यावेळेस ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच देवराम कडू, उपसरपंच हनुमंत फसाळे ग्रामपंचायत सदस्य मिलिंद बदादे,ग्रामस्थ व शिक्षक वृंद उपस्थित होते.

إرسال تعليق