शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

दिल्लीतील पथ संचलनामध्ये शिवानंद पुजारीची निवड__


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


मांजरी बुद्रुक : दिल्लीत होणा-या पथसंचलनामध्ये  ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या शिवानंद पुजारीची निवड झाली.

           पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचा एस.यु.ओ शिवानंद पुजारी या द्वितीय वर्ष भूगोल वर्गातील विद्यार्थ्याची २६ जानेवारी २०२३ रोजी दिल्ली येथे होणा-या कर्तव्य पथ (राजपथ) शिबारासाठी निवड झाली असून तो ऑल  इंडिया परेड कमांडर म्हणून काॅन्टिजंटचे नेतृत्व करणार आहे. 



          महाराष्ट्रातून ११६ कॅन्डीडेडची संचलनासाठी निवड झाली असून त्यात पुणे ग्रुपमधून ३५ कॅन्डीडेडची निवड झाली आहे. त्यामध्ये २ महाराष्ट्र बटालियनचे १३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, मुंबई अ, मुंबई ब आणि पुणे यांचा समावेश असतो. यामध्ये शवानंद अशोक पुजारी या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा व २ महाराष्ट्र बटालियनचा एनसीसी छात्र आहे.

          शिवानंदने तीन महिन्यांच्या मेहनतीत दहा दिवसांचे एक अशी दहा शिबीरे पूर्ण केली आहेत. तसेच शिवानंद पुजारी यांने माळवणकर शुटिंग कॅम्प, आयजीसी इंटर ग्रुप स्पर्धांमध्येही सहभाग घेतला होता. महाविद्यालयाचे एनसीसी युनिट १९७३ मध्ये सुरू झाले असून आत्तापर्यंत २७ छात्रांची निवड दिल्ली येथे होणा-या कर्तव्य पथ (राजपथ) शिबारासाठी निवड झालेली आहे. यावर्षी युनिटमधील तीन कॅडेटसची भारतीय सैन्यदलामध्ये निवड झाली असून ते प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत अशी माहिती एन सीसी युनिटचे प्रमुख ले. डॉ.  धिरज देशमुख यांनी दिली. मांजरी बुद्रुक परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून शिवानंदला शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم