सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : (दि. २४) पौड पोलीसांची धडाकेबाज कारवाई घरफोडीतील आरोपीला जेरबंद करण्यात आले.
पौड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर १/ २०२३ भादवि ४५४,४५७,३८० ता.०३/ ०१ / २०२३ रोजी १६.५४ वा. गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीनी दिनांक ३१/१२/२०२२ रोजी २३.३० ते १/१/२०२३ रोजी सकाळी ०६.४५ वा. चे दरम्यान मौजे कोळवण ता. मुळशी जि. पुणे येथील फिर्यादीचे मातोश्री मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उचकटुन आत प्रवेश करून आतील एक डेल कंपनीचा लॅपटॉप किंमत २०,०००/- रू. चा माल घरफोडी चोरी करून नेले याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाने सुरू असताना पोलीस कॉन्स्टेबल साहिल शेख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्हयातील आरोपी विजेता रामभाऊ शेखावत हा पौड़ कोळवण रोडवर रस्त्याने येणार असल्याची बातमी मिळाली ही माहिती वरिष्ठांना कळवून लगेच पोलीस स्टाप सहा फौज सचिन शिंदे, पोलीस हवलदार बाबा शिंदे, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, पोलीस हवालदार आनंद बाठे, पोलीस नाईक सिध्देश पाटील, पोलीस नाईक गौतम लोकरे, पोलीस कॉस्टेबल अक्षय यादव यांनी आरोपीस ताब्यात घेवुन त्यास अटक करून त्याचेकडून गुन्हयात चोरलेला लॅपटॉप हस्तगत करण्यात आला आहे. त्याचे बरोबर असणारे साथीदार हे अध्याप पर्यंत फरारी आहेत. त्यांचा कसोशीने शोध सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घटटे, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांचे मार्गदर्शनाने करण्यात आली.

إرسال تعليق