शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

गुन्हेगारी प्रवृत्ती पासून विद्यार्थ्यांनी लांब राहावे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे__


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (हडपसर) : अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर व क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयात 'सायबर शिक्षा व सायबर सुरक्षा' या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. 

             विद्यार्थ्यांनी सायबर क्राईम पासून परावृत्त होणे. सोशल मीडियाचा सुरक्षितपणे वापर करणे, सोशल मीडियावरील गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणे व त्याचे महत्व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विशद केले. 

         सायबर सुरक्षा या उपक्रमाची शपथ विद्यार्थ्यांना मनीषा जगदाळे यांनी दिली.

हडपसर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. विद्यार्थ्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीपासून लांब राहून ज्ञानार्जन करावे असे आवाहन हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळे यांनी केले.

         किशोरवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी वृत्तीकडे वळण्याचा कल दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे विद्यार्थ्यांचे जीवन अतिशय उज्वल आहे म्हणून त्यांनी शिक्षणाची कास सोडू नये. विद्यार्थ्यांनी गुन्हे व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून लांब राहावे. विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरक्षितेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असेल , एखादा विद्यार्थी गुन्हा करीत असेल, किंवा गुन्हेसंदर्भात कोणती माहिती असेल तर प्रत्यक्ष आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अरविंद गोकुळे यांनी केले.



          सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी उपस्थितांचा परिचय करून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात चुकीच्या मार्गाने न जाता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून जीवनातील यश संपादन करावे असे आवाहन केले.



           याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी नुकतीच सुरेश घुले यांची नेमणूक झाली याबद्दल त्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे व हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इ .मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم