शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न__


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (हडपसर) : रयत शिक्षण संस्थेच्या गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. आमदार चेतन तुपे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शेर शिवराय चित्रपटात भूमिका साकारलेले अभिनेते बिपीन सुर्वे यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती. 

           त्यासोबत महाराष्ट्र सौंदर्यवती २०१९ चा किताब  मिळवलेल्या प्रियांका हिंगणे - रणावरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सहायक विभागीय अधिकारी शंकर पवार यावेळी उपस्थित होते. तसेच साधना संकुलातील सर्व शाखांचे शाखा प्रमुख उपस्थित होते. 

           विद्यालयातील  नर्सरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला होता. भारतातील सण हे यावर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आकर्षण होते. भारतातील विविध सणांवर आधारित गाण्यांवर विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. ईद, दिवाळी होळी, पोंगल, ख्रिसमस,दुर्गापुजा, गणेशोत्सव, तसेच राष्ट्रीय सण स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन इ. विविध सणांवर आधारित गाण्यांवर विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. 

           भारतातील सणांच्या परंपरा, सर्व धर्म समभाव,  विविधतेत एकता, भक्ती, आनंद, हर्ष, उल्हास या सर्वांची अनुभूती करून देणारे कलाविष्कार विद्यार्थिनींनी सादर केले.

        सर्व पालकांनी या कार्यक्रमास उत्कृष्ट प्रतिसाद दिला. या कार्यक्रमांसाठी विद्यालयाच्या प्राचार्या झीनत सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयातील विभागप्रमुख ज्योती भंडार,  कु. वृषाली घुमटकर, जयश्री पलंगे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Post a Comment

أحدث أقدم