सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : पुणे महानगर पालिकेच्या वतीने अनुषंगाने जय्यत तयारी चालू आहे. शहरात जी -२० परिषदेच्या बैठका होणार असल्याने जगातील ३५ हून अधिक देशांचे अधिकारी येणार आहेत. या निमित्ताने महापालिकेने शहरात विविध सुशोभिकरणाची कामे हाती घेतली आहेत. या परिषदेच्या कार्यक्रम स्थळाकडे जाणारे रस्ते, चौक, विमानतळ ते निवास व्यवस्था असणाऱ्या भागातील रस्त्यांची कामे, डांबरीकरण, पदपथ व्यवस्थित करणे, रस्त्यांवर पडलेला राडारोडा उचलणे, प्रकाश व्यवस्था, भिंती रंगविणे, रस्ता दुभाजकांवर सुशोभित झाडे लावणे, प्रकाश व्यवस्थेचे खांब रंगविणे, कामांचा राडारोडा उचलणे इत्यादी स्वरुपाची कामे विविध स्तरावर केली जात आहेत.
पुणे महानगर पालिकेकडील पथ विभाग, विद्युत विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, उद्यान विभाग इत्यादी विभागांकडून सदर कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून, सुशोभिकरणाच्या दृष्टीने कार्यवाही चालू आहे. तसेच चर्चासत्र, राज्य आणि शेजारील राज्यातील महापालिकांच्या मा. आयुक्तांचा परिसंवाद, संकल्पनांची देवाण-घेवाण चालू आहे. तसेच पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या वतीने जी-२० परिषदेच्या निमित्ताने जनजागृती करणेसाठी शनिवार दि. ७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७ ते ९.३० या वेळेत भव्य सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.
सदर रॅली पुणे महानगरपालिका मुख्य इमारत-मॉडर्न कॅफे चौक- जंगली महाराज रस्ता- अलका टॉकीज चौक- टिळक रस्ता - अभिनव कॉलेज चौक - बाजीराव रोड - शनिवारवाडा अशा मार्गाने पुणे महानगरपालिका भवन येथे संपन्न होणार आहे.



إرسال تعليق