शुभांगी वाघमारे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : पुणे महानगरपालिका झोन क्र. २ येथील आंबेगाव बु. व धनकवडी येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत येऊन १४३७० चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. आंबेगाव बु. स.नं. ७, १२, १० येथील विना परवाना बांधकामावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम ५२ (१) (अ) आणि कलम ५३ (१) (अ) अन्वये नोटीस देऊन कारवाई करणेत येऊन सुमारे १३०० चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
कारवाईमध्ये स.नं. ७ येथील श्री. जाधव व इतर यांचे ५० चौ. फुट, स.नं. १२ येथील इन्फिनिटी बिअर अॅण्ड वाईन शॉप यांचे १८० चौ. फुट, साई कलेक्शन यांचे १८० चौ. फुट, सुदामा पावभाजी यांचे १८० चौ. फुट, कमल सुपर मार्केट यांचे १८० चौ फुट, स.नं. १० येथील महाराजा स्नॅक्स यांचे ५० चौ. फुट, साविज किचन यांचे १८० चौ. फुट, मातोश्री दम बिर्याणी यांचे १२० चौ. फुट, श्री सद्गुरु मेस अॅण्ड स्नॅक्स सेंटर यांचे १८० चौ. फुट असे एकूण १३०० चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. सदरची कारवाई २ जेसीबी, बिगारी सेवक, पोलिस गट व इतर मशिनरीच्या सहाय्याने करण्यात आली.
आंबेगाव बु. स.नं. ४५ भोलेनगर येथील विना परवाना बांधकामावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम ५२ (अ) आणि कलम ५३ (१) अन्वये नोटीस देऊन कारवाई करणेत येऊन सुमारे १२५०० चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
या कारवाईमध्ये स.नं. ४५ पार्ट येथे श्री. पप्पु घोलप, श्री. महेश बघोडे व इतर यांचे २८०० चौ. फुट, श्री. पाटील महेश, लक्ष्मी नारायण चवंडी व इतर यांचे ९०० चौ. फुट, श्री. माणिकचंद दुगड, देसाई व इतर यांचे ८०० चौ. फुट, श्री. अमित यादव, श्री. विजय कुंभार व इतर यांचे ८००० चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले..
ही कारवाई पोलिस कर्मचारी १ गट, बिगारी, ३ ब्रेकर, २ जेसीबी यांचे सहाय्याने पूर्ण करणेत आली. धनकवडी स.नं. ३४ पार्ट, २८ पार्ट, ३० पार्ट व ३३ पार्ट येथील विना परवाना बांधकामावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम कलम ५३ (१) अन्वये नोटीस देऊन कारवाई करणेत येऊन सुमारे ५७० चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
या कारवाईमध्ये स.नं. ३४/१७ / १ येथील श्री. जितेंद्र अवसरे, श्री. रविंद्र घोगरे व इतर यांचे ६० चौ. फुट, स.नं. २८ पार्ट येथील पराशर बिल्डींग राघवनगर यांचे २२५ चौ. फुट, स.नं. ३० पार्ट दौलतनगर येथील विनिता कुलुंगे व इतर यांचे १८० चौ. फुट, स.नं. ३३ पार्ट राजमुद्रा सोसायटी येथील श्री. लक्ष्मण बारगुडे व इतर यांचे १०५ चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. असे प्र. माहिती व जनसंपर्क अधिकारी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

إرسال تعليق