शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे ५०० नागरिकांना अन्नदान वाटप__


 रणजीत दुपारगोडे

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे : ५०० शूरवीरांना मानवंदना  २०५ व्या शौर्य दिनानिमित्त (दि.१) रोजी दलित पॅंथर पुणे शहराच्या वतीने पुणे स्टेशन येथे भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन कले.



          त्यानंतर भीमा कोरेगाव येथे विजयीस्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व तसेच शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे ५०० लोकांना अन्नदान चे पॅकेट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक (मा,अर्जुन शिंगे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष) व समिना शेख अध्यक्ष हडपसर विधानसभा महिला आघाडी, बाळासाहेब पवळे अध्यक्ष हडपसर विधानसभा, रामा होळीकेरी प्रभाग ३७ अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते इस्माईल भाई, गणेश होळीकेरी, बाबू कुरेन, विनोद भाई, दत्ता भराटे सर्व दलित  पँथरचे कार्यकर्ते महिला आघाडी व भिम सैनिक मोठे संख्येने सहभागी होते.

Post a Comment

أحدث أقدم