सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : लोहगड किल्ला हे एक ऐतिहासिक महत्व असलेले स्थळ आहे. सदर ठिकाण दिनांक २६/०५/१९०९ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणुन घोषीत करण्यात आलेले असुन भारतीय पुरातत्व विभाग यांचे अधिपत्याखाली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील लोहगड किल्यावरील हाजी हजरत उमरशावाली बाबा यांचा संदल उरूस सुरू होत आहे.
(सदर उरूसास शिवप्रेमी व हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध आहे.)
तरी या कारणास्तव भारतीय पुरातत्व विभागाकडुन या ठिकाणी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आलेली आहे.
तरी लोहगड किल्ला या परीसरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन मा. प्रांताधिकारी मावळ यांचेकडुन फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. तसेच लोहगड परीसरात या दृष्टीने पोलीस अधीक्षक कार्यालय, पुणे ग्रामीण यांचेकडुन योग्य तो पुरेसा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
जमावबंदी दरम्यान आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या इसमांवर योग्य ती कारवाई करण्याचे संकेत मा. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण यांनी दिले आहेत.

إرسال تعليق