शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

नारायणगांव येथे ५ ग्रॅम वजनाचे ४०,०००/- रूपये किंमतीचे मेफेड्रोन (DRUGS) तसेच एक चारचाकी कार जप्त__


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. जुन्नर) : (दि. ०३) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नारायणगांव पोलीस स्टेशन परिसरात घरफोडी गुन्ह्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, नारायणगांव येथे ओझर फाट्यावर एक इसम मैफड्रोन (DRUGS) नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यावरून त्या ठिकाणी सापळा रचला असता एक व्यक्तीला ताब्यात घेतले. 

          ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मंजर बशीर खान, रा. शिपाई मोहल्ला, जुन्नर, जि. पुणे असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या उजव्या बाजूच्या पुढील खिशात प्लास्टिकच्या पुडी मध्ये मेफेड्रोन (DRUGS) नावाचा अंमली पदार्थ मिळून आला.


(मुद्देमालाचे वर्णन पुढील प्रमाणे) 


१) ४०,००० /- रूपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (drugs) अंतरराष्ट्रीय बाजार किंमत ८,०००/- रूपये प्रती ग्रॅम प्रमाणे


२) ३,००,००० /- रूपये किंमतीची मारुती स्विफ्ट कंपनीची कार


३) ००.२ प्लास्टिकच्या लहान पुड्या असा एकूण ३,४०,००० /- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २२ (अ) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी नारायणगांव पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

        वरील कामगिरी ही मा अंकित गोयल, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण, मा. मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, मा मंदार जवळे, उपविभागीय पोलीस अधीकारी जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि पृथ्वीराज ताटे (नारायणगांव पोस्टे), पोसई गणेश जगदाळे, पोसई पाटील (नारायणगांव पोस्टे), पो. हवा दीपक साबळे, पोना संदीप वारे, पो.कॉ अक्षय नवले, पोना दिनेश साबळे (नारायणगांव पोस्टे), पो कॉ सचिन कोबल (नारायणगांव पोस्टे) यांनी केली आहे.

       

(खुनाच्या गुन्हयातील आरोपीस मा. न्यायालयाकडुन सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा__) 


           पौंड पोलीस स्टेशन गु.र.नं. ७२/२०१७ भा.द.वि. कलम ३०२, ५०४ मधील आरोपी नामे विनोदकुमार केहरिसिंग बंजारा, वय ३५ वर्षे, रा. सध्या कासार अंबोली, मुळशी, जि. पुणे मुळ गाव उत्तरप्रदेश यास मे. पी. पी. जाधव सो, कोर्ट पुणे यांनी आरोपीस ता. भा.द.वि. कलम ३०२ खाली जन्मठेप व ५,००० /- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

             गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक, एन. एस. मोरे, सध्या सेवानिवृत्त यांनी | केला होता. कोर्ट पैरवी अंमलदार सहा फौज / विद्याधर निचित, सहा फौज / बी. बी. कदम यांनी कामकाज पाहिले आहे तर सरकारी अभियोक्ता म्हणुन चंद्रकांत साळवी यांनी कामकाज पाहिले आहे.

Post a Comment

أحدث أقدم