शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

दृष्टिकोन आणि समज येण्यासाठी अशा शिबीरांची गरज- श्रीमती बागेश्री मंठाळकर,


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


मांजरी बुद्रुक : विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे संवर्धन व माहिती व्हावी या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय यांच्या संयुक्त वतीने  रायरेश्वर व केंजळगड  या ठिकाणी जिल्हास्तरीय दुर्गसंवर्धन व स्वच्छता शिबिराचे  आयोजन करण्यात आले. 

               या शिबिराचे उद्घाटन रायरेश्वराच्या पायथ्याशी कोर्ले या गावात करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य माननीय सौ बागेश्री मंठाळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे, शंकरराव भेलके महाविद्यालयाचे, प्राचार्य डॉ. तुषार शितोळे, अमृतेश्वर कला महाविद्यालय विंझर येथील प्राचार्य  डॉ संजीव लाटे रासीयो जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी, डॉ नीता कांबळे उपस्थित होते.  

             कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे  यांनी विद्यार्थ्यांची ओळख करून घेतली व विविध महाविद्यालयातून तसेच वेगवेगळ्या फॅकल्टीचे विद्यार्थी या शिबिराला आल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करून या शिबिराचा उपयोग करून घ्यावा असे मत त्यांनी मांडले. अशा शिबिरांचा उपयोग व्यक्तिमत्व विकास आणि आत्मविश्वास वाढण्यासाठी होतो असे त्यांनी सांगितले.  कार्यक्रमात यानंतर डॉ संजीव लाटे यांनी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगून यामुळे विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी साध्य होतात त्यांना स्वतःच्या क्षमता कळतात भोवतालचा परिसर कळतो अशी माहिती दिली. यानंतर डॉ तुषार शितोळे यांनी प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांचे काम नियोजनबद्ध असून सतत काही ना काहीतरी सकारात्मक उपक्रम घेण्याकडे त्यांचा कल असतो आणि अशा उपक्रमातून महाविद्यालय, विद्यार्थी, शिक्षक यांना अनेक गोष्टी साध्य होतात असे मत त्यांनी व्यक्त केले. 



        शिबिरात आल्यानंतर संपूर्णपणे त्यात रंगून जा त्याचा आनंद घ्या असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. दृष्टिकोन आणि समज या दोन गोष्टी वेगळ्या असून त्याचा वापर कसा करावा हे एनएसएस मध्ये चांगल्या प्रकारे शिकता येते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक नीता कांबळे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. सविता कुलकर्णी यांनी केली या शिबिराचे नियोजन डॉ. सविता कुलकर्णी प्रा.अविनाश राठोड, जीडी आवटे डॉक्टर वंदना सोनवले, संजय जेधे यांनी केले. यानंतर जेवण करून विद्यार्थ्यांनी रायरेश्वराची वाट धरली. आजूबाजूला दिसणारे डोंगर त्यातून असणाऱ्या पायवाटा, झाडी, दिसणारे पक्षी यांचे निरीक्षण करत विद्यार्थी गडाच्या पायथ्याशी पोहोचले. त्यानंतर कड्यावर असणाऱ्या लोखंडी शिड्यांच्या आधारे विद्यार्थी रायरेश्वरावर पोचले. पाण्याचे  कुंड पाहून तेथील थंड पाण्याचा आस्वाद घेत, शंकराच्या मंदिरात दर्शन घेऊन परिसर निहाळत मुक्कामाच्या ठिकाणी पोचले. 



दुसऱ्या दिवशी सकाळी घनश्याम केळकर यांनी रायरेश्वर परिसराची माहिती दिली. या परिसरात राजगड तोरणा सिंहगड पुरंदर यासारखे किल्ले असून महाबळेश्वर पठार आहे रायरेश्वर हे पठार असून समोर महाबळेश्वर पठार व पाचगणी, कमळगड दिसतात अशी माहिती दिली. शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची सुरुवात येथील शंकराच्या देवळात शपथ घेऊन केली त्यामुळे याला वेगळे महत्त्व आहे. या ठिकाणी पाण्याची कुंड असून येथे राहणाऱ्या लोकांना यातून पाणी पुरवली जाते. यावेळी विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता केली. तेथे असणारे प्लास्टिक गोळा करून गोणीत भरले.  यानंतर विद्यार्थी सात रंगाची माती बघण्यासाठी रवाना झाले.



          जाताना रस्त्यात आजूबाजूला असणारे प्लास्टिकचे कागद  गोळा करून एका पोत्यात एकत्र करण्यात आले. रायरेश्वराच्या धानवली रस्त्याच्या बाजूला मातीमध्ये विविध रंग असल्याचे दिसते खडकामध्ये असणाऱ्या विविध खनिजांमुळे हे रंग आले असल्याची माहिती डॉ. सविता कुलकर्णी यांनी दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी खाली उतरून केंजळ गडाची वाट धरली. थोडीशी कठीण असलेली वाट वाटेवरून प्रवास करत विद्यार्थी केंजळ गडावर पोचले. वर पोचल्यावर कातळात खोदलेल्या पायऱ्या असून त्यावरून वर जाता येते. वरती थोडासा सपाट परिसर असून पाण्याचे कुंड आहे. येथेच चुन्याचे घाणे असल्याचे दिसते यानंतर तेथील परिसर पाहून विद्यार्थी कोरले गावात  उतरले. या शिबिराचा समारोप करण्यात आला यावेळी घनश्याम केळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना उपस्थितीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना या ठिकाणाचे महत्त्व सांगून अशा आपल्या ऐतिहासिक वारसा चे संवर्धन आपण केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. या शिबिराचे नियोजन डॉ सविता कुलकर्णी डॉ वंदना सोनवणे प्रा अविनाश राठोड, संजय, जेधे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. या शिबीरामध्ये विविध महाविद्यालयातील १०५ विद्यार्थी सहभागी झाले होते.

Post a Comment

أحدث أقدم