शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

दामिनी मार्शल वैशाली उदमले यांना सावित्रीमाई पुरस्कार


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (हडपसर) : रयत शिक्षण संस्थेचे एस.एम.जोशी महाविद्यालय व आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय आणि क्रिडा शिक्षक संघ आयोजीत जागतिक महिला दिनानिमित्त सावित्री सन्मान व व्याख्यन,"भारतीय संविधान महिलांचे अधिकार"

शनिवार दिनांक 18/03/2023 रोजी आदर्श महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये हडपसर पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अमलदार वैशाली शहादेव उदमले दामिनी मार्शल हडपसर पोलीस स्टेशन यांना महिला व मुली शाळेतील मुले यांच्या सुरक्षिततेसाठी भरोसा सेल गुन्हे शाखा पुणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने करत असलेल्या चांगल्या कार्याबद्दल रूपालीताई चाकणकर अध्यक्ष राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सावित्रीमाई पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर रूपालीताई चाकणकर अघ्यक्ष राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य, मुंबई. मा. ॲड असीम सरोदे, ॲड स्मिता सरोदे .एस एम जोशी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड, अध्यक्ष आरोग्य विज्ञान महाविद्यालय ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघ प्राध्यापक संदीप चोपडे, डॉ. प्रवीण पंडित सविधान लोकोत्सव समिती प्रतिनिधी ग्रंथपाल, सिंहगड इंजिनिअरिंग महाविद्यालय प्राध्यापक डॉ. शंतनू जगदाळे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक रुंद, विविध क्षेत्रातील मान्यवर सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم