शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कडेकोट पोलिस बंदोबस्तात कानेगावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 132 वी जयंती साजरी


 अतुल सोनकांबळे

अमर जाधव 

 महाराष्ट्र पोलीस न्युज 


   उस्मानाबाद : २६/०४/२०२३ रोजी मौजे कानेगाव भीमनगर येथे प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधीसत्व पं. पूज्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस बौध समाजमंदीरा समोर पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचे उदघाटन, भीमनगर कानेगाव चे सुपुत्र आयु. चंद्रकांत माने इंजिनीअर सेवानिवृत्त यांच्या हस्ते करून ,बाबासाहेबाच्या जंयतीची सुरुवात झाली. 

          या प्रसंगी भीमनगर कानेगाव येथील जयंती कमीटीचे अध्यक्ष शिवाजी माने, उपाध्यक्ष जोतीबा सोनवणे, विलास कांबळे, धनराज कांबळे, बळवंत कांबळे, बळीराम कांबळे, मसाजी कांबळे, नागनाथ कांबळे आणी कल्याण माने व इतर सर्व लहान थोर मंडळी महिला व पाहुणे सर्व गावातील मित्र या जयंती मध्ये सामील झाले. 

        या मिरवणुकीमध्ये विश्व 24 न्यूज चॅनलचे सोनकांबळे पत्रकार व सूर्यवंशी प्रतिनिधी उमरगा यांनी या जयंती कव्हर केली. ही मिरवणूक व्यवस्थीत शांतपणे पार पडावी यासाठी उमरग्याचे उपविभागीय पोलिस अधीक्षक बरकते, लोहारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक चिंतले, त्यांच्या फौज फाट्यासह तैनात होते. लोहारा तहशीलचे अधिकारी एस पी आफीस उस्मानाबाद येथील अधिकारी उपस्थित राहिले. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वाजत गाजत संत मारूती महाराज मंदिराला प्रदक्षिणा घालून भीमनगर कानेगाव येथील बौद्ध समाजात विसर्जित बुध्द वंदनेने झाली.

      या जयंतीच्या यशा मागे जिल्हाधिकारी ओबांसे, एस पी उस्मानाबाद व मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद या सर्वांचा वाटा आहे.

Post a Comment

أحدث أقدم