शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

लहान मुलांसाठी आवश्यक असलेली कोव्हक्स लस तयार - आदर पुनावाला यांनी दिली माहिती...


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे : शहरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असतानाच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. यामुळे आता लहान मुलांची काळजी मिटली आहे. लहान मुलांसाठी आवश्यक असलेली कोव्हक्स लस तयार असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिली. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

          केंद्राची सध्या आम्हाला कोरोना लसीची मागणी नाही. मात्र, आम्ही ६ मिलियन लसीचा अतिरिक्त साठा तयार करून ठेवला आहे. यूएस आणि युरोपमध्ये आपल्याकडील एकाच लसीला मान्यता आहे. परंतु, तिचीही मागणी सध्या खूप कमी आहे. आम्ही आम्हाला मिळालेला पैसा हा लसीच्या संशोधनासाठी वापरतो. देशासाठी, देशाबरोबर काम करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. असे पूनावाला यांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم