अतुल सोनकांबळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे इंदापूर : येथील भैरवनाथ देवाच्या चरणी मोहळचे विधानसभा मतदार संघाचे आमदार व कृषि उत्पन्न बाजार समिती इंदापुर नुतन बिनविरोध संचालक यशवंत(तात्या)माने, तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती इंदापुर चे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, माजी संचालक मधुकर भरणे यांचेसह सर्व उमेदवाराच्या हस्ते जागृत देवस्थाण श्री भैरवनाथाच्या मंदिरात श्रीफळ वाढवुन प्रचाराची सुरुवात करण्यात आली. कर्मयोगी सह.साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष भरत शहा, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणुमंत कोकाटे,
जि.प.माजी सदस्य प्रताप पाटील, कांतिलाल झगडे, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश जाधव, रणजित पाटील, बाळासाहेब करगळ, व पदाधीकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
तर विलास सर्जेराव माने, दत्तात्रय फडतरे, संग्रामसिंह निंबाळकर, रोहित मोहळकर, मनोहर ढुके, संदिप पाटील, रूपाली वाबळे, मंगल झगडे, आबा देवकाते, तुषार जाधव, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रौनक बोरा, ज्ञानदेव दिवसे असे सर्व उमेदवार व बिनविरोध निवडुन आलेले संर्व संचालक उपस्थित होते.
त्यानंतर इंदापूर येथील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार संस्थापक कै. मा.खा शंकरराव(भाऊ)पाटील यांच्या अर्धपुतळ्यास उमेदवारानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
इंदापूर शहरातील महात्मा फुले, अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले.
नरसिंहपूर येथील नरसिंह देवाच्या चरणी निवडणुक प्रचाराचा नारळ फोडून आरती ही करण्यात आली .


إرسال تعليق