शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या नुतन पदाधिकारी यांचा सन्मान


 रणजित दुपारगोडे
महाराष्ट्र पोलीस न्यूज

  सोलापूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सहसचिव  राजाभाऊ सोनकांबळे यांचा ह्रदय सत्कार. सोलापूर := आरक्षण हक्क कृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अभ्यासु व्यक्तिमत्व असलेले संघटन प्रिय असे सोलापूर जिल्ह्याचे सहसचिव राजाभाऊ सोनकांबळे यांची नुकतीच करण्यात आली. 
          कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या नुतन विभागीय सरचिटणीस पदी बिनविरोध निवड झाल्याप्रित्यर्थ आज त्यांचा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आयटीआय विजापूर रोड सोलापूर यांच्या वतीने मुख्य कार्यालयामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील एस.एस.शिंदे, ज्येष्ठ गट निदेशिका, व संघटनेचे अध्यक्ष बी.जे.मोटे यांच्या हस्ते आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे ज्येष्ठ नेते सटवाजी होटकर तसेच संघटनेचे मार्गदर्शक आशुतोष नाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत "कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी " संघटनेचे नुतन विभागीय सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांचा शॉल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
          यावेळी ए.टी.सरडे, एस. आर.गोलेकर, गट निदेशक, ए.व्ही.घोणसे, प्रमुख लिपिक तथा कार्यालयीन अधीक्षक यांनी आपले विचार व्यक्त केले.यानंतर नुतन विभागीय सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांनी एस टी महामंडळाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसेच आपणही माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळेच मी संघटनेच्या विभागीय सरचिटणीस सारख्या जबाबदार पदापर्यंत पोहोचलो असुन आपल्या सर्वांच्याच विश्वासास कायम पात्र राहुन सर्व कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सत्वर हाजीर राहीन. असे आपल्या मनोगगातून भावना व्यक्त केल्या. 
          यावेळी व्ही.व्ही.जेधे, प्रमुख लिपिक, आय.टी.आय. निदेशक संघटनेचे सचिव एस.एल.शेळके, बी.एस. कोंडगुळी, अँप्रेन्टीशिप ऍडव्हाईजर (बीटीआरआय) तसेच एस बी.गडगडे आस्थापना लिपिक आणि आय टी आय कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष एस.ए.लोहार यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. शेवटी संघटनेचे ज्येष्ठ नेते सटवाजी होटकर यांनी उपस्थित कर्मचारी वर्गाचे आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم