शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मुंबई विजापूर पॅसेंजर सुरू करण्याची खासदार निंबाळकर यांच्या कडे भाजपा महिला आघाडीच्या वतीने निवेदन


 धनंजय काळे

महाराष्ट्र पोलीस न्युज


सोलापूर : माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माढा तालुक्यात आले असता भारतीय जनता पार्टी महिला आघाडी च्या वतीने बंद असलेली मुंबई विजापूर पॅसेंजर सुरू करण्याची मागणी खासदार यांच्या कडे महिला शहर अध्यक्ष प्रतीक्षा गोफ़ने यांच्या वतीने करण्यात आली. या वेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी लवकरात लवकर गाडी सुरू करण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न करु व ही गाडी लवकर सुरु करण्यात येईल हे आश्वासन दिले. 

          यावेळी महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष धनश्री खटके, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उमेश पाटील सरचिटणीस सुधीर गाडेकर  महिला शहर सरचिटणीस स्वाती ताई गोरे , विद्या गोसावी, पद्मावती दातार, वासंती गवळी, बालाजी गायकवाड, सागर तरंगे आदी उपस्थित होते.



Post a Comment

أحدث أقدم