शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा


सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे हडपसर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

            महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे व शिक्षकेतर कर्मचारी शामकांत साठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे महाराष्ट्र दिन व कामगार दिना बद्दल माहिती महाराष्ट्राच्या जडणघडणीत संत, समाजसुधारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १०५ हुतात्मे यांचे योगदान अधोरेखित केले. त्याच प्रमाणे आजच्या काळात अध्ययन अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाच्या वापराची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगून सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. शुभांगी औटी, प्रा. नितीन लगड, पवन शिंदे, प्रा. सागर कांबळे व विद्यार्थ्यांनी यांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले. दरम्यान पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आधारस्तंभ शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संस्था पातळीवर अध्यापकांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये ई-कंटेंट स्पर्धा विजेते प्रा. रूपाली भावसार, डॉ. नीता कांबळे, डॉ. अंजू मुंढे , निबंध स्पर्धा विजेते प्रा. संजीव पवार यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. एम. जे. खैरे, प्रा. प्रीतम ओव्हाळ, कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रीतम ओव्हाळ यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले. अध्यापकांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये  ई-कंटेंट स्पर्धा विजेते प्रा. रूपाली भावसार, डॉ. नीता कांबळे, डॉ. अंजू मुंढे , निबंध स्पर्धा विजेते प्रा. संजीव पवार यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप,  प्रा. एम. जे. खैरे, प्रा. प्रीतम ओव्हाळ, कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे उपस्थित होते.  सूत्रसंचालन प्रा. प्रीतम ओव्हाळ यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم