शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये शेतीच्या वादातून तीन जणावर गुन्हे दाखल


 गंगाराम उबाळे 

महाराष्ट्र पोलीस न्युज


बुलढाणा (चिखली) : चिखली तालुक्यातील अंत्रि खेडेकर येथील शेतीच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये तीन जनावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

            फिर्यादी प्रमोद केशव मोरे वय ५२ वर्ष यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, दि. ८ मे  दुपारी २:०० च्या दरम्यान अर्जदार त्यांच्या स्वतःच्या शेतात काम करण्यासाठी गेले असता, त्यांच्या शेजारी शेत असलेले प्रल्हाद भिकाजी झिने, उद्धव भिकाजी झिने, भिकाजी झिने हे सर्व राहणार अंत्रि खेडेकर  स्वतःच्या कवठळ शिवारात असलेल्या शेतात नांगरणी करत होते.

             यांना आमचा धुरा का फोडला असे हे वविचारायला मोरे गेले असता प्रल्हाद भिकाजी झिने यांनी त्यांच्या हातातील कुऱ्हाडीचा दांडा मोरे यांच्या डोक्यात मारला. उद्धव भिकाजी झिने यांनी त्यांच्या हातातील दगड मोरे यांना मारला. तर भिकाजी झिने यांनी प्रमोद केशव मोरे यास व त्यांच्या पत्नीला लोटपोट करून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, अशा प्रकारची तक्रार अर्जदाराने १० मे २०२३ ला दाखल अधिकारी पोलीस  हेड कॉन्स्टेबल विलास काकड यांच्याकडे नोंदवण्यात आली. 

                  अशा प्रकारच्या तक्रारीवरून अपन १३०/२०२३ कलम ३०७,३२३, ५०४, ५०४, ५०६,  ३४  भादवी सदरचा गुन्हा दाखल करून, संबंधित अधिकारी यांनी तपासात हाती घेतला आहे. 

          कोर्टाने एक दिवसाचा पीसीआर घेऊन, गुन्हे दाखल करून पुढील जेल दाखल केले आहे. अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंढेरा पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार तपास अधिकारी मनोज वासाडे यांच्या सोबत बीट जमदार भरत पोफळे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव हे पुढील तपास करीत आहे.

Post a Comment

أحدث أقدم