शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

दिवंगत रत्नाकर (तात्या) मखरेंना स्मृतिदिनी अभिवादन...!


 अतुल सोनकांबळे

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (इंदापूर) :- ( दि.१५) इंदापूरचे माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आप्पासाहेब जगदाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भिमाई आश्रमशाळेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

                हर्षवर्धन पाटील म्हणाले, रत्नाकर मखरे (तात्या) आणि माझे वडील कै. शहाजीबापू पाटील यांचे भावासारखे नाते होते. तात्यांनी हयात शोषित, पीडित, वंचित घटकासाठी काम केले. तात्यांच्या शिक्षण संस्थेतून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठे झाले. तात्यांनी घालून दिलेल्या आदर्शवत विचारांची जपणूक ॲड. राहुल मखरे व कुटुंबीय करत आहेत. तात्या आज जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतील, असे प्रतिपादन तात्यांच्या स्मृतींना उजाळा देताना पाटील यांनी केले.

            यावेळी बौद्धाचार्य बाळासाहेब धावारे, सतिश जगताप (पुणे) यांच्या हस्ते व आयु. शकुंतला रत्नाकर मखरे, ॲड. राहुल मखरे, संतोष मखरे, ॲड. समीर मखरे व कुटुंबीय यांच्या उपस्थितीत दिवंगत रत्नाकर मखरेंच्या समाधीस्थळी  त्रिशरण, पंचशील घेऊन पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

             यावेळी बाबजी भोंग, आनंदराव थोरात, प्रा. कृष्णा ताटे, कु. सांची पवार , यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, जयवंत नायकुडे सर, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील, समाधान केसकर (गुप्त वार्ता),  गणेश महाजन, अविनाश कोथमिरे, कैलास कदम, शेखर पाटील, शकीलभाई सय्यद, हनुमंत कांबळे, ॲड. नारायण ढावरे, सागर गानबोटे, गोरख तिकोटे, माऊली नाचण, हमीद आतार, युवराज बन, अश्वजीत कांबळे, संजय कांबळे, अर्जुन चव्हाण गुरुजी, मधुकर जगताप, संग्राम भैलुमे, भास्कर साळवे आदी उपस्थित होते.

            यावेळी बामसेफ व सहयोगी संघटनेचे कार्यकर्ते, संस्थेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व महिला वर्ग उपस्थित होता.

           यावेळी बामसेफचे प्रचारक मा. सुनील (काका) जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. राहुल मखरे यांनी केले, सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले तर आभार नानासाहेब चव्हाण यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم