शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

राधीकाच्या निर्घृण खुणाच्या घटनेच्या निषेधार्थ आज चिखली शहर बंद चे आवाहन


 डॉ. गंगाराम उबाळे 

महाराष्ट्र पोलीस न्युज


बुलढाणा (चिखली) : चिखली तालुक्यातील रोहडा येथील तपोवन देवी संस्थान येथे ६ वर्षीय राधिका विलास इंगळे या चिमुकलीचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला. तिला शोधण्यासाठी  बुलढाणा पोलीस प्रशासनासह राजकीय, सामाजिक व सर्व क्षेत्रातील दोनशे ते अडीचशे  नागरिकांनी तपोवन देवी संस्थान परिसर पिंजून काढला होता. तिचा शोध घेत असताना करतीचा मृतदेह मिळाला होता. तिचा मृतदेह दिसू नये म्हणून तिच्या मृतदेहावर दगडाची पाळ रचली, मृतदेह मिळाल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी बुलढाणा येथे नेऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. 

         या घटनेने समाजात हळहळ व संताप व्यक्त करण्यात आला होता. समाजमन सुन्न करणारी ही घटना काल १३ मे रोजी चिखली तालुक्यातील रोहडा येथील तपोवन देवी संस्थान परिसरात घडली होती. अंढेरा पोलीस स्टेशन सह बुलढाणा पोलीस प्रशासनाची, पोलिसांची विविध पथके राधिकाच्या मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. 

          दरम्यान समाजमनाला हादरवरून सोडणाऱ्या या घटनेने प्रचंड सतांपाची लाट उसळली आहे. मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडा अन् फाशी द्या अशी एकमुखी मागणी आता सामाजिक स्थरावरून होऊ लागली आहे. या घटनेच्या निषेधार्थ  कपिल खेडेकर यांनी आज १५ मे रोजी चिखली शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

           या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये ,राधिका वर जो प्रसंग ओढवला असा दुर्दैवी प्रसंग कुणावरही येऊ नये. या घटनेकडे शासन , प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा बंद असल्याचे सामाजिक कार्यकर्ते कपिल खेडेकर यांनी म्हटले आहे.

         राधिकाच्या मारेकऱ्यांचा पोलिसांनी लवकरात लवकर शोध घ्यावा, मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे असेही खेडेकर यांनी म्हटले आहे. १५ मे रोजी व्यापारी, नागरिक, छोट्या दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم