शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

बाजार समितीत व्यापारी वाहनांना प्रवेश बंद ; पुणे सोलापूर रोडवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा-- वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (हवेली) : कै. अण्णासाहेब मगर उपबाजारात बाजाराचा लिलिव होण्यापूर्वीच आत प्रवेश करणाऱ्या व्यापारी वाहनांना समितीने अटकाव केला.

           हवेली बाजारसमितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली आणि याचाच फटका पुणे सोलापूर महामार्गावरील वाहन चालकांना बसला.



          पुणे सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. याचा फटका इतर वाहनांना बसला या वाहतूक कोंडीने वाहन चालकांना यांचा त्रास सहन करावा लागला.

         थेट शेतकरी ते ग्राहक असे वैशिष्ट्ये असलेल्या बाजार समितीच्या नव्या कारभारी यांंनी सुत्रे हाती घेताच व्यापारी वाहनांना नोएंट्री करण्यात आली. या बाजार समिती मध्ये बाजार फुटण्यापूर्वी शेतकरी वाहनांना परवानगी असतानाही शेतकरी वाहनांच्या आगोदर व्यापारी वाहनेच पुर्ण बाजार काबीज करीत होते. त्यामुळे शेतकरी व ग्राहकांच्या वाहनांना बाजारात जागा मिळत नाही. अनेक व्यापारी आगोदर बाजारात येऊन शेतकऱ्यांकडून माल खरेदी करतात व त्याच मालाची चढ्या दराने त्याच ठिकाणी दुबार विक्री करतात. 

          नव्या कारभारी यांनी हाती सुत्रे घेताच शेतकऱ्यांनी तक्रारी करण्यास सुरवात केली त्याची गंभीर दखल घेत नवनिर्वाचित संचालक मंडळाने बाजार फुटण्यापूर्वी व्यापारी वाहनांना बाजारातील आवारात वाहने आणण्यास बंदी केली. व्यापारी वाहनांना प्रवेश बंद केल्याने या सर्व व्यापारी वाहनांची बाजार समिती बाहेरील महामार्गावर गर्दी झाली होती. या गर्दीमुळे पुणे शहराकडे व सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीची २ किलोमीटर लांब राग लागली होती. यामुळे उन्हात थांबलेल्या वाहतुकीमुळे सर्व प्रवाशांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागला.



          "समितीच्या चुकीच्या नियमामुळे संपूर्ण पुणे सोलापूर महामार्गावर येणारी व जाणारी वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यासाठी समितीने नियोजन लावून योग्य त्या रीतीने शेतकरी माल खरेदीसाठी आलेल्या व्यापारी वाहनांनाही जागा उपलब्ध करून द्यावी," अशी मागणी व्यापारी बाळासाहेब भिसे, व टेम्पो, हमाल पंचायत संघटनेचे अध्यक्ष मयुर फडतरे, व्यापारी अध्यक्ष शिवाजी सूर्यवंशी, संदीप काळभोर, किरण भोर, किरण ससाणे यांनी मागणी केली. "शेतकरी ते ग्राहक अशी या बाजाराची संकल्पना" शेतकरी ते ग्राहक अशी या बाजाराची संकल्पना असताना या ठिकाणी शेतकरी व ग्राहकांना अधीक प्राधान्य आहे. 


---दिलीप काळभोर, सभापती, हवेली बाजार समिती--

         व्यापाऱ्यांनी येथे वाहनांची गर्दी करुन वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी. दोन तीन दिवस केलेल्या पाहणीत बाजार समितीत शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले. त्याच अनुषंगाने नवनिर्वाचित संचालकांनी व्यापारी वाहनांना बाजार समितीत प्रवेश नाकारला. 


--विजय घुले, विभागीय अधिकारी, कै. अण्णासाहेब मगर उपबाजार समीती--


            "उपबाजारा पाठीमागे पीएमआरडीएची अमेनिटी स्पेस आहे. त्याठिकाणी वाहनतळासाठी जागेची मागणी केली आहे. ती जागा उपलब्ध झाल्यास वाहनांच्या पार्कींगचा प्रश्न मिळण्यासाठी मदत होईल.

Post a Comment

أحدث أقدم