शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बीजेपी विरोधात आले पोलीस ठाणे येथे अर्ज दाखल




शुभांगी वाघमारे

महाराष्ट्र पोलीस न्युज


सोलापूर (माढा) टेभूर्णी : दि. २२ मे २०२३ रोजी सत्ताधारी भाजप पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय मा. जयंतराव पाटील यांना ईडी या तपास यंत्रणेचा वापर करून त्रास देण्याचा आणि बदनामी करण्याचा जो प्रकार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे. असा दावा राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आला आहे. त्याविरोधात निषेध नोंदविण्यासाठी माढा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे माढा तालुक्याचे आमदार आदरणीय बबनराव शिंदे व माढा तालुक्याचे युवा नेते आदरणीय रणजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस माढा तालुका यांच्या नेतृत्वात व राष्ट्रवादी युवक सरचिटणीस माढा तालुका अध्यक्ष प्रणित शिरढोणे टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे पवार मॅडम पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. 

              यावेळी संभाजी पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस माढा तालुका अनिल तोडकर कार्याध्यक्ष रा. यु. काँ. OBC संजय मिस्कीन, ता. उपाध्यक्ष रा.यु.काँ. आप्पासाहेब पाटील ता. उपाध्यक्ष रा.यु.काँ, संतोष पाटील ता.उपाध्यक्ष रा.यु.काँ., अतुल कासवेद उपाध्यक्ष OBC सेल, भजनदास गायकवाड पाटील ता. उपाध्यक्ष रा.यु.काँ, आदित्य जाधव सचिव रा.यु.काँ. माढा तालुका, प्रणित शिरढोने सचिव रा.यु.काँ. माढा तालुका, मंगेश देशमुख टेंभुर्णी शहराध्यक्ष, संतोष लोंढे कार्यकारिणी सदस्य, पिंटू लोंढे कार्याध्यक्ष टेंभुर्णी शहर, शंभूराजे देशमुख, सोशल मीडिया टेंभुर्णी शहर, भालचंद्र पाटील, भालचंद्र झुंजारे. उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم