शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

जालना मेहकर हायवेवर अपघात एसटी बस चालक जागेवर ठार, वाहक गंभीर जखमी


 डॉ. गंगाराम उबाळे. 

महाराष्ट्र पोलीस न्युज


बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथे दुसरबीड ते सिंदखेडराजा मार्गावर पळसखेड चक्का फाट्याजवळ कंटेनर व बसचा अपघात झाला. असून अपघात हा गंभीर स्वरुपाचा असून, जीवित हानी झाल्याचेही प्राथमिक माहिती मिळाली असून अपघाताची घटना सकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास घडली असून, किनगावराजा ठाणेदार युवराज रबडे व त्यांचे सहकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून, तातडीने मदतकार्यास सुरुवात करण्यात आली आहे.

          दुर्घटनेतील बस मेहकर आगाराची रातराणी असून, पुण्याहून मेहकर येथे परत येत होती. घटनेवेळी त्यावर चालक राजू टी. कुलाल, वडगाव तेजन, ह. मु. हिवरा आश्रम व वाहक पी. आर. मुंढे, दुसरबीड हे कर्तव्यावर होते, दोन्ही ही. चालक जागेवरच ठार झाले असून, वाहक गंभीर जखमी झाले आहेत. तर पाच प्रवासी जागेवर ठार झाले असून चार उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. एकूण नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला. बारा प्रवासी गंभीर जखमी आहेत काहिना जालना व संभाजीनगर येथे हलवण्यात आले असून जखमेवर उपचार चालू आहे.



Post a Comment

أحدث أقدم