शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

नैराश्यातून व आजाराला कंटाळून आत्महत्या : आबनावे कुटुंबाचा टोकाचा निर्णय अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत


 सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज

पुणे (हडपसर) : लक्ष्मी निवास बिल्डिंग भोसले व्हीलेज फुरसुंगी येथे तीन व्यक्तींनी आत्महत्या केली.
        असा ०६.३५ वां नियंत्रण कक्ष यांनी हडपसर पोलीस ठाण्याला संदेश दिला. या संदेशाच्या आधारे हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अरविंद गोकुळे आपल्या टिम सहित तात्काळ घटनास्थळावर पोहचले. असता. त्या ठिकाणी एक वयस्कर इसम हे मृत अवस्थेमध्ये असल्याचे १०८ वरील डॉक्टर यांनी पोलीसांना सांगितले.
          ठिकाणी एक महिला ह्या उभ्या होत्या त्यांनी तिथे पोहचलेल्या पोलिसांच्या टिमला सांगितले की, मी यांची चुलत सून असून माझे नाव भाग्यश्री रुपेश आबनावे राहणार कोंढवा. असे पोलिसांना  सांगितले. की, ह्या घरात तीन व्यक्ती राहतात सूर्यप्रकाश हरिश्चंद्र आबनावे त्यांची पत्नी जनाबाई सूर्यप्रकाश आणावे मुलगा चेतन सूर्यप्रकाश अबनावे . त्यापैकी जनाबाई सूर्यप्रकाश यांना कॅन्सरचा आजार होता व मुलगा चेतन आबनावे यांना फिट येण्याचा आजार होता तसेच चेतन यांचा दोन वेळा घटस्फोट झाला असून त्यांना कोणते हे अपत्य नव्हते व त्यांची नोकरी देखील गेली होती, त्यामुळे तो नैराश्यात होता पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी आम्हाला फोन केला व सांगितले की आईला लास्ट स्टेज कॅन्सर आहे, माझी पण नोकरी गेली आहे तर आम्ही आत्महत्या करण्याच्या विचारात आहोत. 
         त्यामुळे मी तसेच आमचे सर्व नातेवाईक यांनी सूर्यप्रकाश आबनावे व त्याचे परिवारास यांना समजावले असता त्यांनी आम्हाला सांगितले की बायको आणि मुलगा गेल्यानंतर मी जगून काय करू मी देखील त्यांच्यासोबत जाणार अशी माहिती दिली. आज आज रोजी सदर कुटुंबाचा फोन लागत नसल्याने त्यांनी येथे येऊन दरवाजा वाजवला असता सदरचा दरवाजा मुलगा चेतन यांनी उघडला तो बोलण्याच्या अवस्थेत नव्हता तसेच त्याची आई बेडवर झोपलेली होती व वडील सूर्यप्रकाश हे बाजूला पडलेले दिसले म्हणून त्यांनी तात्काळ डॉक्टरांना फोन करून बोलवले व १०८ वरील डॉक्टर आई व मुलगा नामे चेतन यास उपचार कमी ससून रुग्णालय ते घेऊन गेले. तसेच वडील सूर्यप्रकाश यांना डॉक्टर यांनी मयत घोषित केले, 
           या घटनेची पोलीसांनी कंट्रोल रूम ला ०६:२८ ला सविस्तर माहिती दिली. घटनास्थळावर वर उशीवरती व गादीवरती  तसेच फरशी वरती उलटीचे डाग दिसत आहेत, सदर घटनेबाबत अधिक चौकशी सुरू असून आबनावे कुटुंबाने आजाराला कंटाळून नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची माहिती प्राथमिक माहिती आहे. ऍडमिट केलेली आई आणि मुलगा चेतन याकडे अधिक चौकशी करणे बाकी आहे असल्याचे हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अरविंद गोकुळे यांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم