शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मुक्ता जंगम मुंबई पोलीस तर ममता महाजन पुणे पोलीस पदी निवड झाल्याने सन्मान



 डॉ. गंगाराम उबाळे

महाराष्ट्र पोलीस न्युज


बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथील मुक्त विष्णू जंगम हिची मुंबई पोलीस पदी निवड झाली तर हनुदखेड येथील ममता महाजन यांची पुणे पोलीस पदी निवड झाल्याबद्दल साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार कर्तव्यदक्ष नंदकिशोर काळे व मलकापूर पांगरा बीटचे बीट  जमादार निवृत्ती पोपळे यांच्या हस्ते मलकापूर पांगरा येथे सत्कार करण्यात आला.

           यावेळी मलकापूर पांग्रा चे उपसरपंच भगवानराव उगले, पत्रकार भगवान साळवे, पत्रकार प्रल्हाद देशमुख, फकीरा पठाण, पवन मगर, अमोल साळवे पत्रकार डॉ. गंगाराम उबाळे, आयुब भाई पोलीस कॉन्स्टेबल नितीन जाधव सिंदखेडराजा पंचायत समितीचे माजी सभापती विनायक राठोड, विष्णू जंगम भगवान जंगम, गंगाराम महाजन व संकल्प क्लासेस चे शिक्षक प्रदीप दानवे आधी सर्वांनी जंगम व महाजन या दोन्ही मुलींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

أحدث أقدم