शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पंडित नेहरू विद्यालयातील कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


 डॉ. गंगाराम उबाळे 

महाराष्ट्र पोलीस न्युज


बुलढाणा (सिंदखेड राजा) : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील पंडित नेहरू विद्यालय कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा सायन्स शाखाचा निकाल ९९.०७% असून (एकुण विद्यार्थींची संख्या १०८ पैकी १०७ उत्तीर्ण ०१ परिक्षेस गैरहजर) व आर्ट्स शाखेचा निकाल ७९.१६% (एकूण विद्यार्थी संख्या २४ पैकी १९ उत्तीर्ण ०५ परिक्षेस गैरहजर ) असा निकाल लागला असून या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने एका भव्य कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

         यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य रवींद्र मोरे, प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख गणेश डिघोळे  अमोल कुटे ,शंकर उगलमुगले, सुभाष बोंद्रे, गजानन आटोळे, दिलीप नागरे, संजय सोनुने आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सायन्स शाखा प्रथम क्रमांक. ओम शंकर उगलमुगले  ८६% द्वितीय क्रमांक कु. वृषाली सुभाष बोंद्रे ८२.६७% व तृतीय क्रमांक प्रज्वल दिलीप नागरे ८८.८६% आणि आर्टस शाखा प्रथम क्रमांक भारत आत्माराम थोरवे ६८.८३% द्वितीय क्रमांक कु. पल्लवी  सोमीनाथ गाडेकर ६७.८३% तृतीय क्रमांक कु. वर्षा भिकाजी कायंदे ६७.५० उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक टी टी साबळे यांनी केले. संकल्प क्लासेस चे. संचालक प्रमुख मार्गदर्शक प्रदीप दानवे सर, संदीप बोंद्रे, रमेश मुरकुट, देशमुख मॅडम, श्रीकृष्ण तायडे पंडित नेहरू विद्यालय कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद यांनी या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

Post a Comment

أحدث أقدم