डॉ. गंगाराम उबाळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
बुलढाणा (चिखली) : चिखली तालुक्यातील मलगी या गावातील इ क्लास जमिनी मध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे चिखली तालुक्यातील मलगी भागांमध्ये एकच खळबळ उडाली.
महिला ही जिंतूर परभणी येथील असल्याची मलगी गावामध्ये चर्चा आहे. ही महिलाही २० तारखेपासून मलगी गावामध्ये गावाच्या काही भागांमध्ये भाकरी मागून खात होती. दिनांक २६ मे रोजी गावातील काही मुले गावातील इ क्लास जमिनीवरील करवंदाच्या जाळीकडे करवंद खाण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी महिलेचे प्रेत करवंदाच्या जाळीमध्ये नग्न अवस्थेमध्ये दिसून आले आहे. ज्या ठिकाणी महिलेचे प्रेत दिसून आले आहेत त्या ठिकाणी संपूर्ण डोंगराळ भाग व नाल्याचा भाग असल्यामुळे या भागामध्ये नागरिकांची वर्दळ जास्त नाही. महिला ही २० तारखे पासून मलगी गावामध्ये राहत असल्याची चर्चा गावामध्ये सुरू आहे. या घटनेची परीसरात बातमी पसरताच मलगी गावचे पोलीस पाटील यांनी याची माहिती चिखली पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर चिखली पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी मलगी गावामध्ये येऊन त्यांच्या पंचनामा करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.


إرسال تعليق