मल्लिकार्जुन हिरेमठ
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : बारामती पोलिस विभागा विषयीच्या विविध तक्रारींचे निराकरण करण्यासाठी बारामती हद्दीमध्ये तक्रार निवारण दिनाला आज पासून सुरु होणार आहे. तक्रार निवारणामध्ये तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी दिली
आजपासून मंगळवारी (ता.२) सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत माळेगाव पोलिस ठाण्यात पहिल्या तक्रार निवारण दिनाला सुरुवात झाली आहे. भोईटे यांनी तक्रारदारांचे म्हणणे स्वत: ऐकून घेत आहेत.
-----अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांची माहिती-----
या माध्यामातून नागरिकांच्या विविध समस्या, तसेच तक्रारींचे निराकरण प्रभावीपणे व वेळेत व्हावे, प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेतले जावे व त्यांच्या तक्रारीत तथ्य असेल तर त्या वर योग्य ती कायदेशीर कार्यवाही व्हावी. हा तक्रार निवारण दिनाचा आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे.
बारामती अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर या 5 तालुक्यातील 13 पोलीस स्टेशन येतात. सर्वच ठिकाणी असे तक्रारनिवारण दिन आयोजित केले जाणार आहेत.
ज्यांचे गुन्हे, अर्ज, अदखलपात्र गुन्हे या बाबत योग्य कारवाई झाली नाही, अवैध धंदे, गुंडागर्दी, महिला सुरक्षा, याविषयी तक्रारी असतील किंवा काही ठिकाणी पोलीस कर्मचा-यांविरुद्ध तक्रारींबाबत तक्रार निवारण दिनी नागरीकांनी थेट वरीष्ठ अधिकार्यांना भेटता येणार आहे.

إرسال تعليق