सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं.
शरद पवारांचं आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. परंतु ते निवृत्त कधी होणार याबाबत त्यांनी सांगितलं नाही.
-----सभागृहात कार्यकर्ते नाराज..!-----
शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृहात कार्यकर्ते नाराज झाले होते. यावेळी आम्ही राजकारणात सक्रिय राहणार नाही, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

إرسال تعليق