डॉ. गंगाराम उबाळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन येथे दिनांक २४ मे रोजी दोन जणांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली, त्यामध्ये मयूर बाजीराव इंगळे वय २२ वर्षे या तरुणांनी सुद्धा गजानन बोंद्रे यांच्या शेतातील शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या मागे १ भाऊ १ बहीण आई असा परिवार आहे.
याच दिवशी दुसरी एक घटना विठ्ठल विश्वनाथ शिंगणे वय ५४ वर्ष यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
या प्रकरणी ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार रामदास वैराळ यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला 'व प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. एकाच दिवशी दोन आत्महत्या झाल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून नेमके आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
'पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जामदार रामदास वैराळ करत आहे.

إرسال تعليق