सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत ग्रामीण महिला व बालक विकास मंडळातर्फे (GMBVM) महिलांचा सर्वांगीण व्यापक विकास व त्यांचे सशक्तीकरण करण्याचे लक्ष ठेवून महिलांनी निवडलेला व्यवसाय चालवण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दिनांक ३१ मार्च २०२३ पासून महिला बचत गट सदस्यांकरिता २१ दिवसीय “जरदोशी वर्क व एम्ब्रॉयडरी वर्क प्रशिक्षण” शिवाजी उद्यान, ग्रामपंचायत हॉल लोणी काळभोर येथे देण्यात आले.
प्रशिक्षणास लोणी काळभोर परिसरातील विविध २० बचत गटातील ६८ महिला महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षका अश्विनी मेमाणे यांनी विविध प्रकारचे जरदोषी वर्क व एम्ब्रॉयडरी वर्क याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण मार्गदर्शन दिले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी संतोष गदादे, ग्रामीण विकास केंद्र हडपसर चे प्रभारी व सचिव GMBVM यांनी महिला व बालक यांच्या सर्वांगीण विकासाकरिता ट्रस्ट मार्फत राबविण्यात येणारे अर्थजनास उपयुक्त विविध प्रशिक्षण कार्यक्रम, प्रदर्शन तसेच स्वयंसहाय्यता गट तयार करणे, सर्वात महत्वाचे स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्यांसाठी व्यवसाय निवड, त्यातील सातत्य व उपक्रमशीलता यासंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे भरत बर्वे, सहायक महाप्रबंदक बँक ऑफ महाराष्ट्र, यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थीना बचत गटाच्या माध्यमातुन स्वावलंबन व स्वतन्त्र विचार करणे. आत्मविश्वास आणि स्वयोग्यता वाढविणे याच बरोबर व्यवसाय साक्षर कसे व्हावे यासंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी सहभागी प्रशिक्षणार्थीनी तयार केलेले विविध प्रकारचे जरदोषी वर्क व एम्ब्रॉयडरी वर्क यांचे प्रदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास आनंदराजे पाटील, मुख्य प्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र, राजेंद्र काळभोर, उपसरपंच लोणी काळभोर, माजी सरपंच तसेच ट्रस्ट चे बाळकृष्ण पाटील, विनायक विभूते, स्वाती मॅडम आदि उपस्थित होते.
ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ ट्रस्टच्या समन्वयक संगीता काळभोर यांनी कार्यक्रम व कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

إرسال تعليق