रणजित दुपारगोडे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : दि. ०३ रोजी बांधकाम विकास विभाग झोन २ पुणे महानगरपालिका मार्फत येवलेवाडी मधील सर्वे नंबर ३३ मधील ५ मजली इमारतीवर ६००० चौ. फूट क्षेत्रावर जॉ कटर च्या साह्यायाने व सर्वे नंबर. ३१ मधील हिल टॉप हिल स्लोप मधील अनाधिकृत प्लॉटिंग मधील ६ बांधकामे ७५०० चौ फूट क्षेत्रावर, ३००० चौ. फूट क्षेत्रावरील गोडावून तसेच प्लॉटींग चे रस्ते उखडून टाकणेची कारवाई करणेत आली. या कारवाई साठी १ जॉ कटर, ३ जेसीबी गॅस कटर व अतिक्रण विभागाकडील ९ बिगारी इत्यादी सामुग्री च्या सहाय्याने ही कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांचे पथकाने पार पाडली.
कारवाई मध्ये उप अभियंता श्री राजेश खाडे, विजय कुमावत, शाखा अभियंता प्रशांत मोरे, इमारत निरीक्षक उमेश गोडगे, सागर सपकाळ उपस्थित होते. तसेच अतिक्रमण पोलीस निरीक्षक अडागळे यांचे सह अतिक्रमण विभागाकडील पोलीस कर्मचारी यांचे पथक उपस्थित होते.



إرسال تعليق