शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सोमंगल बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून वारीला पायी चालत जाणार्या भक्तांची पाणी व फराळाचे पदार्थ वाटून सेवा : अध्यक्ष दिपक कुचेकर.


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज

 

पुणे (हडपसर) : मनुष्य जन्माला येऊन मनुष्य जन्माचे सार्थक कसे करायचे या उदात्त हेतूने मांजरी बुद्रुक येथील कुचेकर कुटुंबांनी मानवतेची सेवा करायची ठरवली. या निष्पाप निर्मळ हेतूने सेवा व सामाजिक कार्य करत असताना सोमंगल बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना केली. 

              या ट्रस्टच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष दिपक कुचेकर व संस्थापक उपाध्यक्ष मनिषा कुचेकर यांनी खर्या अर्थाने समाजसेवा करायची ठरवली.



            याच माध्यमातून  २०२३ चा श्री संत जगदगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये मांजरी फार्म, येथे पाणी व फराळ वाटप सोमंगल विश्वस्तांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले. 

           या ऊपक्रमाच्या माध्यमातून समाज सेवा व समाजहिताचे उपक्रमावर भर देणार असल्याचे सांगितले. ट्रस्टच्या माध्यमातून भविष्यात समाजासाठी उपक्रम राबवण्यात येतील. व ट्रस्ट संदर्भात इतर माहिती पाहिजे असल्यास ट्रस्ट चे विश्वस्त यांच्याशी संपर्क साधावा असे बोलताना संस्थापक अध्यक्ष दिपक कुचेकर यांनी सांगितले.

           यावेळी दिपक कुचेकर, सौ. मनिषा कुचेकर, गणेश चोरमले, राहुल चांदणे, नितीन जाधव हे विश्वस्त उपस्थित होते.

            --अधिक माहितीसाठी संपर्क--

संस्थापक अध्यक्ष दिपक कुचेकर मो. न. ९०२८४४४७३७





Post a Comment

أحدث أقدم