शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

उर्जा - प्रकाश - चेतना....समाधानी भेट : अनिलकुमार गिते


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे : माझ्या जन्मभूमीतील  परळी तालुक्यातील शेखरजी मुरकुटे (कार्यकारी अभियंता प्रकाशभवन/रास्ता पेठ) पुणे तर 

        सोमनाथ मुंढे यांनी नुकताच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी - महावितरणच्या पिंपरी शहर कार्यक्षेत्रात कार्यकारी अभियंता पदाचा पदभार स्वीकारला.

               सरळ सोप्या भाषेत समाजातील प्रत्येक माणसाला सहज समजून घेऊन तात्काळ त्याची अडचण मार्गी लावणारे... स्वतःच्या मेहनतीच्या बळावर प्रामाणिकपणे कष्ट करत महावितरण सारख्या महत्वाच्या महामंडळामध्ये कार्यकारी अभियंता हे महत्वाचं वर्ग-१ संवर्गातील पद मिळवलं.. ज्या ज्या ठिकाणी साहेबांनी जबाबदारी स्वीकारली त्या भागात स्वतःच्या कार्याची यशस्वी मोहर अनेकवेळा दाखवुन दिलेली आहे.

            आपल्या परिसरातील व्यक्तीवर पुणे व पिंपरी सारख्या अतिमहत्त्वाच्या शहरात वीज वितरणासारखी महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे हे ऐकून खूप आनंद झाला प्रसंगी साहेबांची भेट घेऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

               एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे विद्वान, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व एक जिल्हाधिकारी IAS असायला पाहिजे होते. तरीही आज कोणतेही क्षेत्र असो त्या क्षेत्रात महत्वाच्या पदांवर कार्यरत असून महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या आणि माझ्यासारख्या अनेक नवयुवकांसमोर नवीन आदर्श प्रस्थापित करणाऱ्या सर्व दिग्गज व्यक्तीमत्वांकडुन आम्हाला नेहमी काहीतरी उर्जा देणाऱ्या सकारात्मक गोष्टी शिकायला मिळतात...

             यावेळी महावितरणमधील सर्व कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या अधिकारी मंडळींची उर्जा देणारी भेट होऊन अनेक विषयांवर चर्चा झाली....! माझा मोठा भाऊ, मार्गदर्शक अमोलदादा सोनवणे (सहाय्यक अभियंता वसई-विरार मुंबई) मोतीराम राख (उप कार्यकारी अभियंता पनवेल) अनिल मुलगीर (सहाय्यक अभियंता भोसरी-पुणे), हेमंत चामले (उप कार्यकारी अभियंता ठाणे) व पांडुरंगजी मुंडे (Infosys IT Company पुणे)......

Post a Comment

أحدث أقدم