शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

भिमाई आश्रमशाळेत योग दिन उत्साहात साजरा : इंदापूर


 अतुल सोनकांबळे

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (इंदापूर) : इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक आश्रमशाळेच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला.

             योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे. हीच प्राचीन परंपरा नवीन पिढीला निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरेल म्हणून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे.



              या दिवशी प्रशालेत क्रीडा, योगा शिक्षक हिरालाल चंदनशिवे व विद्यार्थ्यांनी पूरक हालचाली, अनुलोम- विलोम, ताडासन, कपालभाती, वज्रासन, पद्मासन आदी आसने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केली. विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदात योगा दिन साजरा केला.

               यावेळी उपप्राचार्य सविता गोफणे यांनी योग दिनाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना सतत योगा करण्यास प्रोत्साहन दिले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे आदी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم